*’एमआयटी एडीटी’ विद्यापीठाच्या प्रांजलीचा डबल सुवर्ण धमाका!*
पुणेः
एमआयटी आर्ट, डिजाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, विश्वराजबाग पुणेच्या स्कुल ऑफ बायोइंजिनिअरिंगची विद्यार्थीनी प्रांजली विनोद सुरदुसे हिने नुकत्याच नागपूर येथे पार पडलेल्या १०वी वरिष्ठ गट राष्ट्रीय मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेच्या स्ट्रोक महिला सांघिक गटात व श्री जगदीश प्रसाद झाबरमल टिबरेवाल विद्यापीठ, मुंबई येथे झालेल्या अखिल भारतीय विद्यापीठ मिनि गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेच्या एकेरी स्ट्रोक गटात सुवर्णपदक पटकावत दैदिप्यमान कामगिरीची नोंद केली आहे.
प्रांजलीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना ६ खेळाडूंच्या संघात सर्वांत कमी ६२ गुण घेत सर्वोत्तच कामगिरीची नोंद केली. महाराष्ट्र पाठोपाठ मध्यप्रदेश व उत्तर प्रदेश संघांनी रौप्य व कांस्य पदक पटकाविले. यासह अखिल भारतीय विद्यापीठ स्पर्धेतही कामगिरीत सातत्य ठेवताना दैदिप्यमान कामगिरीची नोंद करत सुवर्णपदक पटकाविले. प्रांजली ही एमआयटी एडीटी विद्यापीठाची अत्यंत हुरहुन्नरी खेळाडू असून तिने काही महिन्यांपूर्वीच ३७ व्या राष्ट्रीय मिनीगोल्फ स्पर्धेत महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधीत्व करताना रौप्य व जेजेटीयू विद्यापीठ झुंझनू, राजस्थान येथे झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ मिनी गोल्फ अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक पदक देखील पटकाविले होते.
प्रांजली या या सुवर्ण कामगिरीबद्दल विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश कराड, कार्यकारी संचालक प्रा.डाॅ.सुनीता कराड, कुलगुरू प्रा.डाॅ.राजेश एस., प्र.कुलगुरू डाॅ.मोहित दुबे, डाॅ.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा.पद्माकर फड, डाॅ.सुराज भोयार यांनी तिचे अभिनंदन केले आहे.
______________________________
*संवाद मीडिया*
👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓👨🏻🎓🧑🏻🎓
*प्रवेश सुरू!! प्रवेश स्वरू!!!प्रवेश सुरू!!!*
*💊💊B.PHARMACY व D.PHARMACY 💊💊🧑🏻🎓👨🏻🎓शै. वर्ष 2025-26 साठी प्रवेश प्रक्रिया सुरू👨🏻🎓🧑🏻🎓*
*फार्मास्युटिकल्सच्या जगात तुमची क्षमता अनलॉक करा! B.Pharmacy आणि D.Pharmacy प्रवेशासाठी आत्ताच नावनोंदणी करा आणि नावीन्यपूर्ण आणि आरोग्यसेवा उत्कृष्टतेच्या प्रवासाला सुरुवात करा. फार्मास्युटिकल उद्योगात तुमचे भविष्य सुरक्षित करा. आजच अर्ज करा!*
डिस्टिंक्टिव एज्युकेशन सोसायटी संचलित
*श्री रामराजे कॉलेज ऑफ फार्मसी, दापोली.*
*तालुका- दापोली, जिल्हा- रत्नागिरी*
(सलग्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,लोणारे आणि PCI-Delhi,DTE,MSBTE व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त )
*DTE CODE-03712*
*👉अभ्यासक्रम :*
*🔸️फार्मसी पदविका (D.Pharmacy)*
*Choice Code-0371282311)*
प्रवेश क्षमता- ६०
*पत्रता*-बारावी भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र अनिवार्य विषयामध्ये उत्तीर्ण आणि गणित किंवा जीवशास्त्र यापैकी एका विषयासह उत्तीर्ण.
*🔸️फार्मसी पदवी (B.Pharmacy)*
*Choice Code-0371282310)*
प्रवेश क्षमता- ६०
*पात्रता*- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र किंवा भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित मध्ये ४०% गुणांसह बारावी उत्तीर्ण, सामान्य श्रेणीसाठी वर्गी / श्रेणी आणि भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित किंवा भौतिकशास्त्, रसायनशास्त्र, जीवशास्त्र मध्ये ४५ गुण. MH-CET अनिवार्य आहे
*👉प्रवेशासंबंधी अधिक माहितीसाठी खालील दिलेल्य मोबाईल क्रमांकावर संपर्क साधून एकवेळ महाविद्यालयास अवश्य भेट द्या.🙏*
*संपर्क-*
*9420156771, 9145623747, 7887561247*
*पत्ता*- प्रांत ऑफिस जवळ,ता.दापोली , जि. रत्नागिरी
(कार्यालय दररोज 9.00 ते 5.00 या वेळेत सुरू राहील.)
*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/176501/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*
