You are currently viewing इनर व्हील पिंपरी क्लबच्या अध्यक्षपदी सविता इंगळे यांची निवड.

इनर व्हील पिंपरी क्लबच्या अध्यक्षपदी सविता इंगळे यांची निवड.

इनर व्हील पिंपरी क्लबच्या अध्यक्षपदी सविता इंगळे यांची निवड.

पिंपरी’ चिंचवड

इनर व्हील पिंपरी क्लबचा पदग्रहण समारंभ सोहळा बुधवार दिनांक 2 जुलै रोजी संध्याकाळी, 4.00 वाजता, ‘रोटरी क्लब पिंपरी’ चिंचवड एमआयडीसी, चिंचवड सभागृहामध्ये पार पडला. या पदग्रहण समारंभाला इनर व्हीलच्या जिल्हा अध्यक्ष, डॉ. आशा देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी व्यासपीठावर, जिल्हाध्यक्षा डॉ. आशा देशपांडे, इनरव्हील पिंपरी क्लबच्या माजी अध्यक्षा, शालिनी चोप्रा, माजी सचिव मधुरा प्रधान, नवनिर्वाचित अध्यक्षा सविता इंगळे, नवनिर्वाचित सचिव, आनंदीता मुखर्जी, खजिनदार नीलम मेहता व्यासपीठावर उपस्थित होत्या.

यावेळी, डॉक्टर आशा देशपांडे यांनी, इनर व्हील पिंपरीच्या नवनिर्वाचित समितीला मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या की चांगले नेतृत्व करण्यासाठी, आत्मविश्वास असायला हवा, सोबत काम करणाऱ्या सदस्यांशी सल्ला मसलत केली पाहिजेत, सर्वांना प्रोत्साहन आणि प्रेरणा दिली पाहिजे, कामामध्ये सचोटी आणि परिवर्तन आणायला हवं. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची तयारी, क्षमाशील वृत्ती हे सर्व गुण ज्यांच्या अंगी आहेत. तो एक उत्कृष्ट नेतृत्व करणारा नेता ठरू शकतो.” तसेच त्यांनी, इनरव्हील पिंपरीच्या माजी अध्यक्ष शालिनी चोप्रा यांना, 2024-25 या वर्षीच्या केलेल्या प्रकल्पाबद्दलचे कौतुक केले. यावेळी संपादक स्मिता टिळेकर, व स्टेजवर उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते, बुलेटिन प्रकाशित करण्यात आले.

यावेळी दोन महाविद्यालयीन मुलींना व एका शालेय विद्यार्थिनीला शैक्षणिक फीस देण्यात आली, त्याचबरोबर ‘दान करा टाकू नका’ या उद्दिष्ट अंतर्गत, वापरात असणाऱ्या चांगल्या वस्तू ‘विशाल संपूर्ण आरोग्य संस्था’ या संस्थेला भेट देण्यात आल्या. त्याचबरोबर कुंडमळा येथे झालेल्या अपघातात जखमी झालेल्या एका महिला शिक्षिकेला व्हील चेअर भेट देण्यात आली. या व्हील चेअरचे प्रायोजकत्व वैशाली जैन यांनी केले. त्याच बरोबर हॅंडीकॅप सेंटरला, श्रवणयंत्रा साठी रक्कम भेट देण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला, डॉ. पी. डी. सोनवणे, डॉ. भारती सोनवणे, डॉ. अंजली नारायणे, मनोज व्हटकर, या मान्यवरांसोबत, इतर क्लबच्या अध्यक्षा सचिव, तसेच इनरव्हील पिंपरी क्लबच्या, अनघा रत्नपारखी, वैजयंती घारपुरे, मोहिनी गोयल, मधू बवेजा, या सदस्यांची उपस्थिती तसेच इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी विनिता अरोरा, आणि वृंदा आंबेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तन्वी चोप्रा, स्नेहा इंगळे, ओंकार इंगळे, श्री. मल्लिकार्जुन इंगळे, व इनरव्हीलच्या सर्व सदस्या यांचे संयोजनात सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे आभार मधुरा प्रधान यांनी मानले.

इनर व्हील क्लब पिंपरी ची कार्यकारणी समिती पुढील प्रमाणे

अध्यक्ष – सविता इंगळे

आयपीपी – शालिनी चोप्रा

उपाध्यक्ष – मधुरा प्रधान

सचिव – आनंदीता मुखर्जी

खजिनदार – नीलम मेहता

आंतरराष्ट्रीय सेवा संयोजक – वृंदा आंबेकर

संपादक – स्मिता टिळेकर

क्ल्ब प्रकल्प संयोजक – मनीषा समर्थ

______________________________
*संवाद मीडिया*

👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕👩‍⚕

*प्रवेश!!प्रवेश!!प्रवेश!!*

संजिवनी नर्सिंग कॅालेज ला प्रवेशासाठी चांगला प्रतिसाद
*सन २०२५-२६*
संजीवनी प्रशिक्षण संस्था संचलित
*संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज* ,
२ रा मजला,वांगडे शॅापिंग कॅाम्प्लेक्स,बहादुरशेख नाका,चिपळूण,

संजीवनी DMLT नर्सिंग कॅालेज,
मंदार कॅम्पस, पेढांबे, ता.चिपळूण.जि.रत्नागिरी

या नर्सिंग व पॅरामेडिकल महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष *२०२५/२६* करिता

*GNM* Nursing -3 Years -12th
(महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मान्यताप्राप्त)
DMLT – 1year -Bsc or 12th science.
ANM – 2year -10th -12th pass.
DOTT – 2year 12th pass.
MPHW – 2year 10pass.
रुग्ण सहाय्यक -8pass/10/12th fail
*१००% नोकरीची हमी*
या कोर्सेस साठी प्रवेश देणे सुरू आहे.

वैशिष्ट्ये-ः
– अत्याधुनिक प्रयोगशाळा
– ⁠उच्चशिक्षित प्राध्यापक
– ⁠हवेशीर वर्गखोल्या
– ⁠परदेशी नोकरीसाठी मुलाखत परिक्षा तयारी
– ⁠१००% नोकरीची हमी
– ⁠उज्वल परंपरा लाभलेले कोकणातील एकमेव पॅरामेडीकल कॅालेज

🔹विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी पुर्ण माहिती घ्यावी
🔹आपला प्रवेशासंबंधी अधिक माहिती साठी
आपल्या पाल्याच्या प्रवेशाकरीता महाविद्यालयातील खालील नंबरवर संपर्क करावा व महाविद्यालयाला भेट दयावी.

*संपर्क फोन नंबर*
+91 721-8850223,
+91 721-8850220,
*📲7276850220,

www.sanjivaniprashikshansanstha.com
आवश्यक कागदपत्रे
*▪️10वी 12वी चे गुणपत्रक, प्रमाणपत्र*
*▪️शाळा सोडल्याचा दाखला*
*▪️मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट*
*▪️आधारकार्ड*
*▪️रेशन कार्ड*
*▪️पासपोर्ट साईझ फोटो*
इत्यादि…
*Email lD – 👇* sanjivanipsanstha@gmail.com

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/170641/
———————————————-
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*.

क्लब करस्पॉडन्स – वैशाली जैन

सल्लागार समिती – बेला अगरवाल, हंसा मोहन, संगीता देशपांडे, अनुराधा सूद, वैशाली शहा, विनिता अरोरा.

वार्तांकन –
सविता इंगळे
9822018281

प्रतिक्रिया व्यक्त करा