You are currently viewing झाडवाले आजोबा

झाडवाले आजोबा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी अरुण वि देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*झाडवाले आजोबा*

——————————-

तशी खुप जुनी गोष्ट आहे

मनात खोल रुजलेली आहे

जाईल तिथे झाड लावणाऱ्या

आजोबांची ही आठवण आहे ।।

 

हे आजोबा खेड्यात रहायचे

भेटेल त्याला हिरवे रोप द्यायचे

जो लावी हे झाड ,त्याच्या घरी

रोपट्याला पाणी द्यायला जायचे ।।

 

आंब्याची झाडे शेतात लावली

अनेकांची आमराई फुलवली

शाळेत लावली त्यांनी झाडे

मुलांना बागेची गोडी लावली ।।

 

चावडी समोरचे झाड पिंपळाचे

हेही काम झाडवाले आजोबांचे

दुपारच्या सावलीत बसतात लोक

नाव घेतात झाडवाल्या आजोबांचे ।।

 

सांगायचे ते, झाडाकडून शिकावे

निरपेक्षपणे आपण ही जरूर द्यावे

त्यांनीच लावलेले पेरुचे एक झाड

आठवण माझ्या अंगणात आहे ।।

————————————————

झाडवाले आजोबा

-अरुण वि.देशपांडे-पुणे

9850177342

————————————————–

प्रतिक्रिया व्यक्त करा