You are currently viewing मळेवाड येथे दुचाकीवर झाड कोसळले

मळेवाड येथे दुचाकीवर झाड कोसळले

सुदैवाने अनर्थ टळला; एक जखमी

सावंतवाडी – आरोंदा मळेवाड रस्त्यावर केरकरवाडी येथे चिंचेची भलीमोठी फांदी रस्त्यावर कोसळली. यावेळी या मार्गावरून जाणाऱ्या दुचाकीवर ही फांदी कोसळली. यावेळी दुचाकी स्वार गंभीर जखमी झाले. या जखमीला स्थानिक ग्रामस्थानी फांदी खालून बाहेर काढले. यावेळी स्थानिक डॉ. गणपत टोपले यांनी घटनास्थळी येत जखमीवर उपचार केला. दैव बलवत्तर म्हणून दुचाकी स्वार दादा पालयेकर (गोवा पालये) हे बालबाल बचावले. मात्र दुचाकीचे मोठे नुकसान झाले. फांदी रस्त्याच्या मधोमध पडल्याने काही वेळ या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. मात्र स्थानीक ग्रामस्थानी तात्काळ पडलेली फांदी तोडून बाजूला करत वाहतूक सुरळीत केली. सावंतवाडी शिरोडा, आरोंदा, सातार्डा या मार्गावरील रस्त्यावर कलडलेली झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ तोडावी अशी मागणी वाहन चालक, ग्रामस्थ यांच्यातून केली जात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा