कणकवली
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती शाखा कणकवली आयोजित, शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ताधारक विद्यार्थी व इयत्ता पाचवी नवोदय विद्यालयात निवड झालेल्या कणकवली तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी अभिनंदन पत्र वितरणाचा कार्यक्रम नुकताच तळेरे नंबर १ तालुका कणकवली या शाळेमध्ये संपन्न झाला. संघटनेच्यावतीने इयत्ता पाचवी व आठवीतील 68 विद्यार्थ्यांना अभिनंदन पत्र प्रदान करण्याचा संकल्प शिक्षक भारती शाखा कणकवलीचा असून कोरोना आजाराच्या प्रादुर्भावामुळे सर्वच विद्यार्थ्यांना एकत्र बोलवून कार्यक्रम घेणे शक्य नसल्यामुळे, प्रातिनिधिक स्वरूपात 10 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व 4 विद्यार्थी नवोदय विद्यालयात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निमंत्रित करून, त्यांना अभिनंदन पत्र लेखणी व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या शुभहस्ते गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमाला उस्पूर्त प्रतिसाद मिळाला .विद्यार्थ्यांच्या वतीने वैष्णवी पडळकर तर पालकांच्या वतीने श्रीकृष्ण वर्धम यांनी मनोगत व्यक्त केले. संघटनेने मुलांच्या पाठीवर मारलेली थाप निश्चितच कौतुकास्पद आहे. अशा उपस्थितांच्या भावना होत्या. वैष्णवी पडळकर हिने आपल्या भाषणाने तसेच आयएस होण्याच्या संकल्पाचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. तर श्रीकृष्ण वर्दम पालक यांनी नाटळ खांदार वाडी या शाळेमध्ये शिक्षण घेत असलेली आपली मुलगी श्रेया हीला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी शिकविलेल्या ज्ञानातूनच नवोदय विद्यालयात व शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीत निवड झालेली आहे .खरंच सर्व पालकाने विचार करून आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळा व शिक्षकांवर विश्वास ठेवून आपल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण द्यावे असे पालकांना आव्हान केले. त्याचप्रमाणे माझ्या मुलीला आयपीएस करण्याकरिता लागणारे मी कष्ट घेणार आहे. मुलगी ही माझी त्याचप्रमाणे संधीचा लाभ घेईल असा विश्वास व्यक्त करुन संघटनेच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित दिलीप परुळेकर माजी सभापती पंचायत समिती कणकवली, दयानंद नाईक राज्य उपाध्यक्ष शिक्षक भारती, संतोष पाताडे जिल्हाध्यक्ष शिक्षक भारती सिंधुदुर्ग, किसन दुखंडे राज्य संघटक, दशरथ शिंगारे तालुकाध्यक्ष कणकवली, स्मिता कोरगावकर महिला जिल्हाध्यक्ष, यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिनंदन पत्र वितरणाचा समारंभ संपन्न झाला. यावेळी दयानंद नाईक राज्य उपाध्यक्ष, संतोष पाताडे जिल्हाध्यक्ष, दशरथ शिंगारे तालुकाध्यक्ष, लवू पाटील जिल्हा उपाध्यक्ष, संतोष कोचरेकर तालुकाध्यक्ष मालवण, यांनी यशवंत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या शुभेच्छा दिल्या व मार्गदर्शन केले.
या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित लहू पाटील जिल्हा उपाध्यक्ष, सातवसे जिल्हा प्रतिनिधी, बागवे जिल्हा प्रतिनिधी, संतोष कोचरेकर तालुका मालवण, सखाराम झोरे सरचिटणीस दोडामार्ग, सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष प्रयत्न श्रीराम विभुते सरचिटणीस कणकवली, मंगेश खांबळकर कार्याध्यक्ष,मदन कुमार नारागुडे तालुका प्रसिद्धीप्रमुख,शशिकांत तांबे तालुका उपाध्यक्ष, संजय कोळी मुख्य संघटक, कल्पना सावंत अध्यक्ष महिला आघाडी कणकवली, अनुजा रावराणे तालुका संघटक कल्पना सावंत, कोमल दुखंडे उपाध्यक्ष, सखाराम खरात कोषाध्यक्ष यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक दशरथ शिंगारे यांनी केले तर सूत्रसंचालन श्रीराम विभुते यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मंगेश खांबळकर यांनी केले.