You are currently viewing वैभववाडी महाविद्यालयामध्ये १९ वा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस साजरा.

वैभववाडी महाविद्यालयामध्ये १९ वा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस साजरा.

वैभववाडी महाविद्यालयामध्ये १९ वा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस साजरा.

वैभववाडी
महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील संख्याशास्त्र विभाग व सायन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार दि.३० जून रोजी महाविद्यालयामध्ये १९ वा राष्ट्रीय संख्याशास्त्र दिवस प्र. प्राचार्य डॉ. एन. व्ही. गवळी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी संख्याशास्त्रावर आधारित विविध भित्तीपत्रके तयार केली होती. कु.अनुराग शेट्ये, कु. प्रांजली बांदिवडेकर, कु. वैष्णवी भुतल या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे डॉ.आर.एम.गुलदे यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर प्र. प्राचार्य डॉ.गवळी, महाविद्यालयाचे अधीक्षक श्री.संजय रावराणे, संख्याशास्त्र विभागप्रमुख प्रा.एस. एस.भास्कर, डॉ. के. पी. पाटील, प्रा.आर. पी. कशेट्टी, प्रा. व्ही. व्ही. शिंदे व संख्याशास्त्र विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. वैष्णवी गायकवाड हिने केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा