You are currently viewing रविंद्र चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड; देवगडात आतिषबाजीने आनंदोत्सव साजरा

रविंद्र चव्हाण यांची भाजपा प्रदेशाध्यक्षपदी निवड; देवगडात आतिषबाजीने आनंदोत्सव साजरा

देवगड :

सिंधुदूर्गचे सुपुत्र तथा नवनिर्वाचित भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी मंगळवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. याचा आनंदोत्सव साजरा करताना भाजपा कार्यालय जामसंडे येथे फटाक्यांच्या आतिषबाजी करून कार्यकर्ते व नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले.

यावेळी माजी आमदार अजितराव गोगटे, जि. प. माजी उपाध्यक्ष सदाशिव ओगले, बाळ खडपे, सुनिल पारकर, संजय बांबूळकर, जिल्हा उपाध्यक्षा प्रियांका साळसकर, तालुकाध्यक्ष राजा भुजबळ, महिला मोर्चा अध्यक्ष उष:कला केळुस्कर, उपनगराध्यक्षा मिताली सावंत , नगरपंचायत गटनेते शरद ठुकरुल, नगरसेविका आद्या गुमास्ते, तन्वी चांदोस्कर, रुचाली पाटकर, व्ही. सी. खडपकर, माजी नगराध्यक्ष योगेश चांदोस्कर, शहर युवा अध्यक्ष दयानंद पाटील, वैभव करंगुटकर,शहर उपाध्यक्ष मृणाली भडसाळे, शक्तिकेंद्र प्रमुख गणपत गावकर, संजय तारकर, ज्ञानेश्वर खवळे, महेश ताम्हणकर, बूथ अध्यक्ष योगेश घाडी, रविंद्र चिंदरकर, रविंद्र कोयंडे, अनुप बापट, बाळा पाताडे आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा