You are currently viewing १०८ रुग्णवाहिका चालक संपावर..

१०८ रुग्णवाहिका चालक संपावर..

युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानने स्वीकारली रुग्णांची जबाबदारी..

सावंतवाडी :

संपूर्ण महाराष्ट्रभर विविध मागण्यांसाठी १०८ रुग्णवाहिका चालकांचा संप आज १ जुलैपासून सुरू झाला आहे. तो कधी संपेल याची कल्पना नाही. तोपर्यंत रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून युवा रक्तदाता संघटना व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान संघटनेने ओरस किंवा गोवा बांबोळी येथे रुग्णांना नेण्यासाठी रुग्णांची जबाबदारी स्वीकारली आहे.

त्यासाठी युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी व सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री.सतीश बागवे व रवी जाधव, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम यांनी ही सेवा देण्याची जाहीर केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा