*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्माननीय सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*
विसंबून
विसंबून रहावं
लागतं कधी कधी
जेव्हा व्याधी
जडतात….
विसंबून रहाल्याने
कामे रहातात अडून
उगाच रेंगाळून
वेळाने...
बालक वृध्द
घरच्यांवर असतात विसंबून
घ्यावी मनातून
काळजी….
विसंबून रहाण्याची
नकोच ती सवय
होतो अपव्यय
दिवसांचा….
शेतकरी विसंबून
पावसाच्या असतो आशेत
कसायचं शेत
जोमाने…..
कर्मावर विसंबता
फळ जरूर मिळते
प्रयत्नाने लाभते
सुयश…..
विसंबता देवावर
. हलका मनाचा ताण
गावे गुणगान
भक्तीने…!!
०००००००००००
अरुणा दुद्दलवार@✍️
