You are currently viewing “आषाढस्य प्रथम दिवसे” महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे काव्यसंमेलन उत्साहात संपन्न

“आषाढस्य प्रथम दिवसे” महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे काव्यसंमेलन उत्साहात संपन्न

पुणे :

महाकवी कालिदास प्रतिष्ठानचे दरवर्षी प्रमाणे काव्यसंमेलन ‘आषाढस्य प्रथम दिवसे’ गुरुवार दिनांक २६ जून २०२५ रोजी धायरीतील धारेश्वर विद्या कला क्रीडा प्रतिष्ठानच्या सभागृहात ज्येष्ठ गझलकार डॉ. अविनाश सांगोलेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ज्येष्ठ गीतकार श्री. जयंत भिडे तसेच संस्थेच्या उपाध्यक्षा ॲड. संध्या गोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत १०० कवींचे संमेलन झाले. यावेळी वि. ग. सातपुते (आप्पा), मकरंद घाणेकर, काका चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणात डॉ. सांगोलेकरांनी प्रतिष्ठानच्या आजपर्यंतच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर उपस्थित सुमारे ८० कवींचे भव्य कविसंमेलन झाले. यावेळी एकापेक्षा एक सरस काव्यरचनांनी सभागृह काव्यमय मैफिलीत रंगल्याचे जाणवत होते. प्रत्येक कवीच्या सरस रचनेला उत्स्फूर्त दाद मिळत होती. सहभागी सर्व कवींना यावेळी प्रकाशित झालेल्या सुमारे ४३२ पेजेसच्या राष्ट्रीय प्रातिधिनिक काव्यसंग्रहाचे वितरण करण्यात आले.

काव्यसंमेलनाच्या उत्तरार्धात ॲड संध्या गोळे, जयंत भिडे, आणि अध्यक्ष डॉ.अविनाश सांगोलेकर यांनी देखील काव्यरचना, गझल सादर केल्या. त्यानंतर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक, भावकवी मा. वि. ग. सातपुते (आप्पा) यांनी समारोप करताना नेहमीच्या ओघवत्या शैलीत आपले मनोगत व्यक्त करत उपस्थितांचे आभार मानले आणि आपली एक काव्यरचना सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा