सावंतवाडी तालुक्यातील धी बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबईच्या कार्यकारी मंडळावर डेगवे गावचे सुपुत्र तथा डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे सरचिटणीस उल्हास बाबाजी देसाई यांची ‘स्विकृत सदस्य’ म्हणून नुकतीच कार्यकारीणीवर निवड करण्यात आली आहे.
सदर निवड सन २०२२ पर्यंत आहे.या निवडीमुळे डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे अध्यक्ष तथा माजी आमदार गुरूनाथ देसाई यांनी तसेच संस्थेचे इतर पदाधिकारी व बांदा नवभारत शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष व शिक्षण महर्षी आबासाहेब तोरसकर व सचिव विजय सावंत यांनी त्यांचे विशेष अभिनंदन करुन शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
उल्हास देसाई हे डेगवे गावातील असून त्यांना सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्याची आवड त्यांच्या लहानपणा पासूनच आहे. त्यामुळे मुंबईत आल्यावर त्यांनी सर्व प्रथम ते रहात असलेल्या आपल्या मुंबईस्थित वाडीतील तरुणांना एकत्र करुन ४० वर्षापूर्वी डेगवे-आंबेखणवाडी युवक मंडळ, मुंबईची स्थापना करून त्या माध्यमातून सामाजिक कार्यास प्रारंभ केला आहे.ते त्या मंडळाचे एक संस्थापक सदस्य असून मंडळ स्थापने पासून सरचिटणीस पदाची धुरा यशस्वी पणे आजपर्यंत संभाळीत आहेत.
शिवाय डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघाचे गेली कित्येक वर्षे कार्यकारीणी सदस्य, सहचिटणीस या पदावर काम करीत १५ वर्षे चिटणीस, तर २० वर्षे सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. ते एक अभ्यासु व संयमी असून संस्थेचे संस्थापक व सरचिटणीस स्व.शांताराम देसाई यांच्या व इतर सहकारी पदाधिकारी यांच्या माध्यमातून गावात व मुंबईत विविध उपक्रम आपल्या नुतन सहकारी पदाधिकारी यांच्या मार्फत राबविले आहेत. सदर संस्था संचलित डेगवे गावातील “नंदादीप”वाचनालयाचे ते एक संस्थापक सदस्य असून त्या वाचनालयाच्या सह कार्यवाह,व कार्यवाह पदावर काम केले आहे सदर वाचनालयास “रौप्य महोत्सवी” वर्षात शासन मान्य “अ”वर्ग प्राप्त करून दिला आहे. शिवाय सिंधुदुर्ग जिल्हा ग्रंथालयाचे व महाराष्ट्र राज्याचे माजी अध्यक्ष तथा सावंतवाडी तालुक्याचे माजी आमदार मा.जयानंद मठकर साहेब, आमदार रामनाथ दादा मोते साहेब, आमदार शिवराम दळवी साहेब, आमदार दिपक केसरकर साहेब,माजी आमदार गुरूनाथ देसाई, व समाजातील मान्यवर यांच्या उपस्थितीत १२मे २०१२ मध्ये ग्रंथ दिंडी काढून ग्रंथालयाचा ” रौप्य महोत्सव” साजरा केला आहे.
कोकण विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार रामनाथ दादा मोते साहेब व महाराष्ट्र विधान परिषदेचे आमदार तथा विद्यमान खासदार विनायक राऊत साहेब यांच्या आमदार निधीतून नंदादीप वाचनालय अल्पावधीतच संगणक, विविध फर्निचर,पुस्तके घेऊन सुसज्ज केले आहे. या कामात आपल्या संस्थेच्या सर्वश्री हरीश्चंद्र देसाई, नितीन देसाई, बाळा केरकर, रमेश पडवळ, पुरुषोत्तम देसाई व इतर कार्यकारी मंडळातील सहकारी यांनी वाचनालय सुसज्ज करण्यास मोलाचे सहकार्य दिले होते. शिवाय ग्रंथसंख्या वाढविण्यासाठी त्यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. त्यांना शासनाच्या प्रशासकीय कामाचा अनुभव आहे. शिवाय विविध लोकप्रतिनिधी बरोबर त्यांचे जवळचे संबंध आहेत.
अशा सेवाभावी वृत्तीने काम करणाऱ्या उल्हास देसाई यांना राज्य स्तरीय ग्रंथमित्र, समाज गौरव, समाज प्रबोधन, व स्मार्ट लिडर पुरस्कार प्राप्त झाले असून त्यांचा उचित गौरव झाला आहे. त्यांच्या निवडीमुळे डेगवे पंचक्रोशीतील ग्रामस्थ आनंद व्यक्त करून त्यांचे सर्व स्तरावर अभिनंदन होत आहे.
गुरुनाथ देसाई
माजी आमदार,
अध्यक्ष, डेगवे ग्रामस्थ हितवर्धक संघ,मुंबई