दीपक केसरकर यांनी एकता मेळाव्यात दिली माहिती
सावंतवाडी
संकेशवर बांदा हा हायवे ते सावंतवाडीतून जाणार आहे. या राज्य मार्गाचे डीपीआर पूर्ण झाले आहे व लवकरच काम सुरू होईल. येथून वाहतूक होईल, शहरातील रींगरोडच संपादन करणे आवश्यक आहे. मासे विक्री करणारे व्यावसायिक इन्सुलिटेड व्हॅन दिली, छोट्या छोट्या योजनेतून आर्थिक समृद्धी येईल, अशी माहिती आमदार दीपक केसरकर यांनी दिली. सावंतवाडी बॅ. नाथ पै येथे आयोजित व्यापारी एकता मेळाव्यात केसरकर बोलत होते. केसरकर म्हणाले, व्यापा-यांनी पुढील काळात पर्यटन क्षेत्रात देखील गुंतवणूक केली पाहिजे, कोकणच वेगळ वैधानिक विकास महामंडळ स्थापण व्हावे, अशी मागणी होती. मुख्यमंत्री याला मंजुरी देतील. आंबा, काजू शेकडो कोटी रुपयांचा व्यवहार करण्याची ताकद आहे, पर्यटनासाठी वेगळी कॉन्फरन्स ठेवावी, पर्यटनातून विकास होऊ शकतो, कोकण ग्रामीण पर्यटन योजना आहे, त्याला आठ टक्के सवलत आहे, इको टुरिझम, व्हिलेज टुरिझम मध्ये गुंतवणूक करू शकतो, असे त्यांनी सांगितले.