विकसित महाराष्ट्र 2047-च्या सर्वेक्षणात सहभाग होण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
भारत सरकारकडून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भारताला सन 2047 पर्यंत “विकसित भारत-भारत @ 2047 (India @2047)” करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यामध्ये सन 2025-26 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याचे उदिृष्ट जाहिर केले आहे. विकसित भारताची उदिृष्टये साध्य करीत असताना भारतातील राज्यांनासुध्दा सन 2047 पर्यंत संपूर्णपणे विकसित होणे गरजेचे आहे. यादृष्टीने महाराष्ट्र राज्याची अर्थव्यवस्था सन 2047 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर व सन 2047 पर्यंत 3.5 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचविणे हे राज्याचे मुख्य ध्येय आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भविष्यातील वाटचालीसाठी विकसित महाराष्ट्र 2047 च्या अनुषंगाने Vision Document तयार करण्यासाठी दि.06 मे ते 02 ऑक्टोबर 2025 अशा 150 दिवसाच्या कार्यक्रमाची घोषणा केली .त्यास अनुसरुन विकसित महाराष्ट्र 2047 चे नागरिक सर्वेक्षण सुरु करण्यात आले असून यामध्ये सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे.
नागरिक सर्वेक्षण (Citizen Survey):-
1) राज्यातील नागरिकांच्या विकसित महाराष्ट्र 2047 संदर्भातील मते, अपेक्षा, अभिप्राय, आकांक्षा व
प्राथम्यक्रम जाणून घेण्यासाठी नियोजन विभागामार्फत माहिती व जनसंपर्क विभागाच्या मदतीने
राज्यस्तरीय सर्वेक्षण अभियान राबविण्यात येत आहे.
2) विकसित महाराष्ट्र 2047 चे नागरिक सर्वेक्षण दिनांक 18 जून 2025 पासून सुरु करण्यात आले आहे.
या सर्वेक्षणात सामान्य नागरिकांचा सहभाग महत्वाचा आहे. जेणेकरून त्यांच्या समस्या, शासनाकडून
असलेल्या अपेक्षा याबाबत माहिती घेऊन त्यानुसार रोडमॅप तयार करणे शक्य होईल.
3) जिल्हास्तरीय सर्वेक्षणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व अन्य शासकिय कार्यालयांचा सहभाग घेण्यात
येत आहे. विकसित महाराष्ट्र 2047 चे नागरिक सर्वेक्षणात सर्व नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचे आवाहन
जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी केले आहे. विकसित महाराष्ट्रात सहभागी होण्यासाठी https://wa.link/093s9m लिंक वर क्लिक करा.

