मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी
मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय, नौका नयन व डिझेल इंजिनची देखभाल व परिचलण पशिक्षणाचे ८६ वे सत्र दिनांक १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत कालावधी सुरु होत आहे. तरी मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, सिंधुदुर्ग मालवण येथे सुरु होणाऱ्या प्रशिक्षण सत्रासाठी जिल्ह्यातील मच्छिमार युवकाकडून ३० जून २०२५ पर्यंत अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी यांनी दिली आहे.
त्याचा तपशील पुढील प्रमाणे :- प्रशिक्षण कालावधी: दिनांक १ जुलै ते ३१ डिसेंबर २०२५
आवश्यक पात्रता:- उमेदवारांचे वय १८ ते ३५ असावे (आधार कार्ड व रेशन कार्ड ची छायाप्रत जोडणे), उमेदवार किमान चौथी पास असणे आवश्यक (शाळा सोडल्याच्या दाखल्याची छायाप्रत जोडणे आवश्यक). क्रियाशील मच्छिमार असावा (विहित नमुन्यातील अर्जावर मच्छिमार सहकारी संस्थेची शिफारस घ्यावी). उमेदवारास पोहता येणे आवश्यक आहे.
प्रशिक्षण शुल्क :- सहा महिन्याचे रु २७००/- मात्र, दारिद्रय रेषेखालील असल्यास सहा महिन्याचे रु. ६००/- मात्र (दारिद्रय रेषेखालील दाखला आवश्यक)
रोजगार/स्वयंरोजगाराच्या संधी:- राष्ट्रीय सहकार विकास निगम (NCDC) अंतर्गत योजनेतून अर्थसहाय्य घेऊन नौका बांधता येते. सागरी नौकेवर पात्रतेनुसार खलाशी म्हणून रोजगाराची संधी उपलब्ध होवू शकते.
तरी इच्छुक युवकांनी या प्रशिक्षण केंद्राशी किंवा सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय कार्यालयास संपर्क साधल्यास विहित नमुन्यातील अर्ज उपलब्ध करुन देण्यात येईल. अर्ज स्वतःच्या हस्ताक्षरात भरून त्यावर संस्थेची शिफारस घेवून विहित नमुन्यातील अर्ज दिनांक ३० जून २०२५पर्यंत कार्यालयाच्या वेळेत कामकाजाच्या दिवशी वर नमूद केलेल्या कार्यालयास सादर करावे. अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय यांचे कार्यालय, सेवांगण रोड, धुरीवाडा, मालवण किंवा मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र, मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी र. ग. मालवणकर, मोबईल नंबर ९४२२२१६२२० या दूरध्वनीवर सपंर्क साधावा.

