You are currently viewing फूल कळीचे होताना

फूल कळीचे होताना

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री अरुणा दुद्दलवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*फूल कळीचे होताना*

 

फूल कळीचे

होतांना जपावे अलवार

वेलीवर बहार

फुलणारा.‌‌..‌

 

मुग्ध अवखळ

अल्लड नाजूक कळी

हसत पाकळी

उलगडते….

 

कळी उमलता

सुगंध वा-याने दरवळतो

भुंग्यांना कळतो

क्षणात..‌

 

‌ ‌रक्षण करावे

किटक भुंग्यापासून कळीचे

जपून उमलायचे

तिला‌…..

 

एकेक पाकळी

फुलत अशी जाते

सौंदर्याने मढते

सुंदर‌‌.‌‌…

 

समाधान मनात

कळीचे फूल झाले

सर्वार्थाने घमघमले

भोवताल…‌!!

०००००🌹०००००

अरुणा दुद्दलवार@✍️

प्रतिक्रिया व्यक्त करा