देवगड निपाणी रोडवर भले मोठे खड्डे
खड्डे न बुजवल्यास आंदोलन छेडणार – अजित नाडकर्णी
फोंडाघाट
देवगड निपाणी रोडवर भले मोठे खड्डे पडले आहेत. रस्ता करुन २ महीनेही झाले नाहीत, तोपर्यंतच फोंडाघाट मारुती वाडी शासकिय विश्रामगृह आणि सरकारी दवाखान्या रोड समोर खड्डे पडले आहेत.त्या खड्ड्यात पाणी साठत असल्याने रस्य्तावरुन जाणारे लोकं आणि शाळेच्या विद्यार्थी यांचे अंगावर घाण पाणी उडत आहे.तरी सार्वजनीक बांधकाम विभागाने पावसाळी डांबराने हे खड्डे बुजवावेत अन्यथा आंदोलन छेडावे लागेल.असे अजित नाडकर्णी यांनी सांगितले आहे.याची प्रत मंत्री नितेशजी राणे साहेब यांना पाठविली आहे.*

