You are currently viewing “द्या एक मूठ अन्नधान्याचे दान, वाचवूया निराधारांचे प्राण” सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अभियान – रवी जाधव

“द्या एक मूठ अन्नधान्याचे दान, वाचवूया निराधारांचे प्राण” सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अभियान – रवी जाधव

 

सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सावंतवाडी ही एक रजिस्टर संस्था आहे. या संस्थेचे नावलौकिक पूर्ण सिंधुदुर्ग भर आहे याचे कारण ही संस्था सामाजिक उपक्रमा बरोबरच संकटात असलेल्या लोकांच्या सेवेसाठी २४ तास अग्रेसर असते.

तसेच या संस्थेच्या माध्यमातून दरमहा अनाथ आश्रम तसेच शहर व गावांमधील निराधार वृद्ध, आजारी व्यक्तीं पर्यंतर पोहोचून त्यांना आधार देऊन यताःशक्ती जीवनावश्यक वस्तूंची पूर्तता केली जाते. परंतु शहरांमध्ये व गावांमध्ये अशा निराधार व गोरगरीब लोकांचे संख्या खूपच आहे तिथपर्यंत पोचण्यासाठी सुद्धा या संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो परंतु तेथे वेळेत पोहोचण्यासाठी आपल्यासारख्या दानशूर व्यक्तींचा हातभार असेल तर तिथपर्यंत ही संस्था नक्कीच पोहोचू शकते त्यासाठी या संस्थेच्या माध्यमातून एक नवीन उपक्रम सुरू करण्यात येत आहे . “द्या एक मूठ अन्नधान्याचे दान, वाचवूया निराधारांचे प्राण.”

सरकारी धान्य दुकानांवर फक्त तांदूळ आणि गहू दिला जातो परंतु त्याला इतर लागणारे सामान खरेदी करण्या इतका पैसा त्या निराधार व्यक्तींकडे नसतो अशा सामानांची पूर्तता सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून केली जाते.

“अन्नदान – श्रेष्ठदान” त्यासाठी आपण एक मूठभर अन्नदान कराव असे नम्र आवाहन सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केले आहे.

चला तर हा उपक्रम आपण यशस्वी करूनच दाखवूया आणि गोरगरीब निराधारांचे प्राण वाचवूया.

संपर्कासाठी आमचे नंबर आहेत.

रवी जाधव 9405264027

रूपा मुद्राळे 9422633971

लक्ष्मण कदम 9423304674

समीरा खलील 9899714614

या नंबर वर संपर्क साधून आपण अन्नदान करू शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा