राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पर्वानिमित्त विशेष जात पडताळणी मोहिमेचे आयोजन
सिंधुदुर्गनगरी
“राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती पर्व” निमित्त दि.26 जून ते दि.4 जुलै 2025 या कालावधीत साजरा केला जाणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडून अनु.जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे उमेदवारांचे जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येते. दरवर्षी विद्यार्थ्यांनी 12 वीमध्ये शिकत असताना 30 नोव्हेंबर पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक असते. त्यामुळे ” राजर्षी छत्रपती महाराज जयंती पर्व” निमित्त दि.26 जुन ते दि.4 जुलै 2025 या कालावधीत जात प्रमाणपत्र पडताळणीबाबत विशेष मोहीमेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त तथा सदस्य विशाल नाईक यांनी दिली आहे.
या विशेष मोहिमे अंतर्गत प्रत्यक्ष काही महाविद्यालयात जाउन शिबीराचे (कॅम्पचे) नियोजन करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना विहीत मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यात यावेत. या उद्देशाने हा कार्यक्रम डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे यांनी सदर कालावधीत हाती घेतला आहे. 12 वी विज्ञान उत्तीर्ण झाल्यानंतर काही विद्यार्थी वैद्यकिय, अभियांत्रिकी, आर्कीटेक्चर, फार्मसी, कृषी, L.L.B, B.F.A, हॉटेल व्यवस्थापन अशा शाखेच्या उच्च व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतात. यासाठी त्यांना सी.इ.टी / निट / जे.इ.इ / नाटा अशा प्रवेश परिक्षा द्याव्या लागतात. प्रवेश प्रक्रियेसाठी मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे. विद्यार्थ्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवेशापूर्वी त्यांच्या जात पडताळणी अर्जावर निर्णय घेऊन जात वैधता प्रमाणपत्र देणे ही प्रक्रिया करण्यासाठी समितीला निर्णय घेण्यासाठी लागणारा कालावधी 3+2=5 (पाच) महिन्याचा आहे.
त्यामुळे शासन निर्णयनुसार प्रत्येक वर्षी 30 नोव्हेंबर पर्यंत समितीकडे अर्ज सादर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे 11 वी व 12 वी विज्ञान अभ्यासक्रमात शिक्षण घेणारे विद्यार्थ्यांनी https://ccvis.barti.in या संकेतस्थळावर CCVIS येथे ऑनलाईन अर्ज भरावेत. अर्जाची पाटपोठ प्रिंट, मुळ कागदपत्रे व त्यांची साक्षकिंत प्रत लवकरात लवकर विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांनी समिती कार्यालयात सादर करावी, असे आवाहन अध्यक्ष समिक्षा चंद्राकर, उपायुक्त तथा सदस्य विशाल नाईक, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती संशोधन अधिकारी तथा सदस्य सचिव सचिन साळे यांच्याव्दारक करण्यात येत आहे.

