You are currently viewing कोलगाव- बुर्डी पूल येथे कार झाडाला आदळून अपघात….

कोलगाव- बुर्डी पूल येथे कार झाडाला आदळून अपघात….

कोलगाव- बुर्डी पूल येथे कार झाडाला आदळून अपघात….

सावंतवाडी

चालकाचा कार वरील ताबा सुटल्यामुळे गाडी रस्ता सोडून समोरील झाडाला आदळण्याचा प्रकार कोलगाव-बुर्डी पुल येथे घडला. यात चालत जखमी झाल्याचे समजते. मात्र याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात कोणतीही नोंद नाही. संबंधित गाडी ही कोल्हापूर पासिंग आहे. आज सायंकाळी हा अपघात झाला, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सुरू होते. या अपघातात गाडीचे दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वस्तूस्थिती लक्षात घेता त्यात चालक जखमी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा