*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम अभंग रचना*
*अभंग*
कशी करू वारी / सांग तुझ्या दारी /
विठूराया //
भोळा भक्त तुझा / तुच देव माझा / पांडुरंगा //
देवा तुझी वारी / आली माझ्या दारी /
मुक्कामासी //
कशी पाहू स्वारी / उभी विटेवरी /
पंढरीत //
गाव तुझे दुरी / पडलो आजारी /
खाटीवर //
ज्ञाना नामा तुका / जना गोरा चोखा /
भेट नाही //
संत सज्जनासी / मुकलो भेटीसी /
खंत माझी //
तुझ्या दर्शनाची / इच्छा खूप माझी /
कृपाकरी //
कवी:-
*चंद्रशेखर प्रभाकर कासार*
*चांदवडकर, धुळे.*
७५८८३१८५४३.
८२०८६६७४७७.

