You are currently viewing टाक न्हयचीआड येथील ३२ वर्षीय युवकाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू

टाक न्हयचीआड येथील ३२ वर्षीय युवकाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू

टाक न्हयचीआड येथील ३२ वर्षीय युवकाचा खाडीच्या पाण्यात बुडून मृत्यू

सांज्युआंव’ सणानिमित्त आंघोळीसाठी उतरला असताना घडली दुर्घटना

वेंगुर्ले

वेंगुर्ले तालुक्यातील टाक न्हयचीआड येथील जुबाव उर्फ जॉनी सालु फर्नांडिस वय ३२ वर्ष हा आंघोळीसाठी न्हयचीआड येथील खाडीच्या पाण्यात उतरला असता त्याचा बुडून मृत्यू झाला. ‘सांज्युआंव’ सणानिमित्त आंघोळीसाठी उतरला असताना ही दुर्घटना घडली आहे. याबाबत वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करत आहे.

मंगळवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास जॉनी फर्नांडिस हा तेथील खाडीच्या पाण्यात आंघोळीसाठी उतरला होता. मात्र काही वेळातच तो खाडीच्या किनाऱ्याच्या लगत बेशुद्ध अवस्थेत आढळला. तत्काळ त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शिरोडा येथे हलविण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले.

दरम्यान तेथील बेंजामिन येरमु मेंतेरो यांनी दिलेल्या माहितीनुसार वेंगुर्ले पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. याप्रकरणी अधिक तपास हेड कॉन्स्टेबल कदम करीत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा