देवगड / विजयदुर्ग :
महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नातून विजयदुर्ग आगाराकरिता BS-6 प्रकारातील नवीन पाच एसटी बस गाड्या प्राप्त झाल्या असून सोमवारी नितेश राणे यांच्या वाढदिनाचे औचित्य साधून विजयदुर्ग आगारामध्ये केक कापून या नवीन बस गाड्यांचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी पडेल मंडल अध्यक्ष बंड्या नारकर, डॉ. अमोल तेली, रवी पाळेकर, उत्तम बिर्जे, पडेल सरपंच भूषण पोकळे, विजयदुर्ग सरपंच रियाज काझी, महेश बिडये, प्रसाद देवधर, निलेश मणचेकर, महेश चव्हाण, ग्रेसिस फर्नांडिस, महिला मोर्चा पडेल मंडल अध्यक्षा संजना आळवे, ग्रा. पं. सदस्या शुभा कदम, ग्रा. पं. सदस्या प्रतिक्षा मिठबाकर, ग्रा. पं. सदस्या पूर्वा लोंबर, श्रीम. गीता लळीत, विजयदुर्ग आगार व्यवस्थापक विवेक जमाले, विजयदुर्ग स्थानक प्रमुख सचिन डोंगरे, ग्रामपंचायत अधिकारी ए डी वारे, दर्शन डोंगरे, दिपक मिठबवाकर, अमित दत्ताराम डोंगरे, योगेश डोंगरे, विजयदुर्ग आगारातील सर्व कर्मचारी वर्ग, चालक वाहक, ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी विजयदुर्ग वासियांनी आभार व्यक्त केले.

