पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी केले पक्षात स्वागत
कणकवली : देवगड तालुक्यातील आरे येथील शिवसेना ठाकरे सेनेचे पदाधिकारी उद्योजक नितीन विष्णू जेठे व सचिन चव्हाण यांनी पालकमंत्री ना. नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत भारतीय जनता पार्टी पक्षात प्रवेश केला आहे. ना. नितेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे भारतीय जनता पक्षाचे शाल घालून स्वागत केले. यावेळी अमित साटम, संदीप साटम, महेश पाटोळे, सत्यवान पाटोळे, बंटी जेठे, मिलिंद साटम आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
