*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सत्यार्थ जीवनाचा*
******************
कधीतरी सत्यार्थ जीवनाचा कळतो
जन्मच सारा अंतर्मुख होऊनी जातो
जगणे म्हणजे असतो प्रवास केवळ
काळाचा घाला थांबा अतर्क्य असतो
स्पंदनांना या सत्कृत्याचे भान असावे
ऋणानुबंध हा जन्मोजन्मीचा असतो
पापपुण्याचे गणित अंती इथेच सूटते
तोच खरा चित्रगुप्ताचा हिशोब असतो
मनसोक्त मुक्त निष्पाप जगतची रहावे
तो एक मोक्षाचा सात्विकानंद असतो
नामस्मरणात तर चिरंजीवी योग अमृती
जन्म साराच कृतकृतार्थ होऊनी जातो
***********************
*©️वि.ग. सातपुते. ( भावकवी )*
*📞( 9766544908)*
