You are currently viewing अरे पावसा पावसा

अरे पावसा पावसा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य कवी चंद्रशेखर कासार लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*अरे पावसा पावसा* 

 

अरे पावसा पावसा

करू नको असा घात

रुसु नको फुगू बाबा

जाऊ नको तू संपात

 

संप तुझा पडे भारी

कशी फेडू रे उधारी

पिकं जाईल जळून

परतून ये माघारी

 

वरुणा आगमनाची

आम्ही पाहतो रे वाट

नदी नाले वाहतील

शेती वाहतील पाट

 

तुझ्यामुळे मृत्तिकेला

बघ सुगंध जडला

कंठ फुठे कोकीळेला

मोर अंगणी नाचला

 

येरे पावसा पावसा

तुज चंद्र विणवतो

दारी हिरवा निसर्ग

डोळे भरून पाहतो

 

कवी:-

*चंद्रशेखर प्रभाकर कासार*

*चांदवडकर, धुळे.*

७५८८३१८५४३.

८२०८६६७४७७

प्रतिक्रिया व्यक्त करा