You are currently viewing बांदा केंद्र शाळेत योगदिन उत्साहात

बांदा केंद्र शाळेत योगदिन उत्साहात

*बांदा केंद्र शाळेत योगदिन उत्साहात*.

*बांदा*

पीएम श्री जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्रशाळेत स्काऊट गाईड उपक्रमांतर्गत अकरावा आंतररराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. बांदा पतंजली योग समिती व सहजसेवा योग यांच्या वतीने हा योग दिवस साजरा करण्यात आला. बांदा पतंजली योग समितीचे नंदादीप केळुसकर, रेश्मा सावंत, सुवर्णलता धारगळकर व योग समिती सदस्य तसेच सहजयोगच्या पूर्वा नाईक, मंजूश्री मालवणकर,भारती वालावलकर यांनी या दिवशी हा योग वर्ग घेतला. या वेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून देऊन नियमित योगसाधना करण्याचे आवाहन केले. यावेळी प्रार्थना,पूरक हालचाली, विविध आसने, कपालभाती, प्राणायाम, ध्यान,संकल्प,शांतीपाठ यांची प्रत्यक्षिके करून घेतली. सदरचा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी मुख्याध्यापक शांताराम असनकर,स्काऊटर शिक्षक जे.डी.पाटील, पदवीधर शिक्षक उदय सावळ, रंगनाथ परब, फ्रान्सिस फर्नांडिस, शुभेच्छा सावंत, स्नेहा घाडी, जागृती धुरी,कृपा कांबळे,प्रसन्नजित बोचे, सुप्रिया धामापूरकर‌ यांनी सहकार्य केले

प्रतिक्रिया व्यक्त करा