You are currently viewing कणकवली भाजीमार्केटचा वाद उच्च न्यायालयात, ९ फेब्रुवारीला सुनावणी…

कणकवली भाजीमार्केटचा वाद उच्च न्यायालयात, ९ फेब्रुवारीला सुनावणी…

नगराध्यक्षांसह मुख्याधिकारी, नगर रचना सहाय्यकांना उपस्थित राहण्याचे आदेश…

कणकवली

शहरातील भाजी मार्केटचा वाद उच्च न्यायालयात गेला आहे. भाजी मार्केटचे विकासक ग्लोबल असोसिएट यांनी याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी ९ फेब्रुवारीला होणार असून कणकवली नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, नगर रचना सहाय्यक कणकवली यांना उपस्थित राहण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत.
१४ जानेवारी रोजी ग्लोबल असोसिएटला नगरपंचायत कणकवली कडून देण्यात आलेली अनधिकृत बांधकामाबाबतची कलम ​५४ अंतर्गत ची नोटीस बाबत ​पुढील तारखेपर्यंत ​जैसे थे स्थिती ठेवण्याचीही आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे आता कणकवली भाजी मार्केट प्रश्नी ​९ फेब्रुवारी रोजी उच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा