*स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलने मोठ्या उत्साहात साजरा केला जागतिक योग दिन :*
सावंतवाडी
आज शनिवार दिनांक २१ जून २०२५ रोजी स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. प्रशालेतील पि.टी. शिक्षक श्री. शैलेश नाईक यांनी प्रथम विद्यार्थ्यांना योग दिन का साजरा करतात?, योग म्हणजे काय? प्रत्येक मनुष्याला योगा करण्याची का आवश्यकता आहे याचे महत्त्व पटवून दिले. तसेच आजच्या दिवसाचे भौगोलिक, ज्योतिषशास्त्रीय खगोल शास्त्रीय व अध्यात्मशास्त्रीय दृष्ट्या महत्त्व विशद केले. योगाची या वर्षाची थीम ‘ एक योग जीवनासाठी व पृथ्वीसाठी’ ही असून निसर्ग व मानव यांचा सहसंबंध विद्यार्थ्यांना समजावून सांगितला. इयत्ता चौथी ते सातवीच्या विद्यार्थ्यांकडून श्री. शैलेश नाईक सर यांनी ताडासन, वृक्षासन, त्रिकोणासन, अर्ध चक्रासन, पादहस्तासन व बद्धकोनासन ही आसने करुन घेतली. तर इयत्ता पहिली ते तिसरीच्या विद्यार्थ्यांची प्रशालेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी वृक्षासान, ताडासन, पादपश्चिमोतानासन शशकासन, पद्मासान, ओंकार, वज्रासन ही आसने करुन घेतली. अशाप्रकारे इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांकडून राष्ट्रीय स्तरावर दिलेल्या योगासनांचे प्रात्यक्षिक दाखवून ती आसने करून घेतली. योगा जीवनाचा अविभाज्य भाग असून ती एक जीवनशैली आहे. म्हणून प्रतिदिन योग करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांना दिला गेला. प्रशालेतील संचालक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. प्राची साळगावकर यांनी देखील मनुष्याच्या विद्यार्थ्यांना मानसिक व शारीरिक विकासासाठी योगा करणे किती महत्त्वाचे आहे हे सांगून पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन दिले.
