कणकवली :
पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी विद्यामंदिर हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यावाटप केले.पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. मंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे. याच धर्तीवर कणकवली शहरातील विद्यामंदिर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी आज मोफत वह्यावाटप केले. यावेळी विद्यामंदिर हायस्कुलचे मुख्याध्यापक श्री. कांबळे, पर्यवेक्षक श्री. अच्युत वणवे, शिक्षक प्रसाद राणे,तसेच अन्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

