You are currently viewing जि. प.विद्यार्थ्यांनी शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत घेतला EVM चा अनुभव

जि. प.विद्यार्थ्यांनी शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत घेतला EVM चा अनुभव

* जि. प.विद्यार्थ्यांनी शालेय मंत्रिमंडळ निवडणुकीत घेतला EVM चा अनुभव*

*◼️ कै.रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेचा अभिनव उपक्रम*

वेंगुर्ले

कै.रायसाहेब डॉ. रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ शाळेतील विद्यार्थ्यांची शालेय मंत्रिमंडळ निवडणुक EVM तंत्रज्ञान वापरून घेण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक मतदान यंत्रणेचा प्रत्यक्ष अनुभव मिळाला. त्यांच्यात डिजिटल साक्षरता वाढण्यास मदत मिळाली.
जिल्हा परिषद शाळेमध्ये दर वर्षी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शालेय मंत्रीमंडळाची स्थापना केली जाते. ही प्रक्रिया पारंपरिक पद्धतीने मतपत्रिका वापरून शक्यतो राबविली जातं असते. यात नाविन्य आणण्याच्या दृष्टीने शालेय मंत्री मंडळ निवडणुकीत मठ नं १ शाळेने EVM चा वापर शालेय मंत्रीमंडळ निवडणुकीत यावेळी केला. EVM चा वापर केल्याने ही प्रक्रिया आधुनिक, अचूक, पारदर्शक आणि शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त ठरली.
शालेय मंत्रीमंडळ निवडणुकीत EVM तंत्रज्ञान वापरल्यामुळे मतदानाची प्रक्रिया पारदर्शक होते. कोणतेही मत चुकून किंवा हेतुपुरस्सर चुकीचे मोजले जाण्याची शक्यता नसते. मतमोजणी अतिशय जलद होते. निकाल त्वरित आणि अचूक मिळतात. हस्तलिखित मतदानात मोजणी दरम्यान मानवी चुका होण्याची शक्यता असते. EVM वापरल्यास अशा चुका टाळल्या जातात. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख होते मतपत्रिका वापरण्याची गरज राहत नाही. त्यामुळे कागद वाचतो व पर्यावरणाचे रक्षण होते. गोपनीयता जपली जाते. EVM वापरल्यामुळे कोणत्या विद्यार्थ्याने कोणाला मत दिले आहे, हे कोणालाही कळत नाही. यामुळे मतदाराची गोपनीयता टिकून राहते. शाळेतील संगणक, प्रोजेक्टर, शिक्षकांचे तांत्रिक ज्ञान यांचा उपयोग या प्रक्रियेत केला जातो. विद्यार्थ्यांना काहीतरी वेगळं व नाविन्यपूर्ण वाटल्यामुळे निवडणुकीत सहभाग वाढतो.
या निवडणूक प्रक्रियेसाठी EVM अँप चा वापर करण्यात आला. शाळेचे उच्चश्रेणी मुख्याध्यापक अजित तांबे, पांडुरंग चिंदरकर, प्रतिमा साटेलकर, गणेश नाईक यांनी हा उपक्रम प्रभावीपणे राबविला. या निवडणूक प्रक्रियेसाठी मुळदे येथील कॉलेज ऑफ हॉर्टिकल्चर चे विद्यार्थी भूषण माणगावकर, विवेक कांबळी, मानस प्रभू, सार्थक शिंदे, रोहन खाडे, अनिकेत देईकर, संदिप कुमावत यांनी मतदान कर्मचारी म्हणून काम पाहिले. मुख्यमंत्री म्हणून सिद्धी स्वप्नेश ठाकूर ही विजेती ठरली. वेंगुर्ले तालुका गटशिक्षणाधिकारी संतोष गोसावी यांनी पुष्पगुच्छ देऊन तिचे अभिनंदन केले. त्यांनी शाळेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले.

______________________________
*संवाद मीडिया*

🚙🚕🚗🚕🚗🚕🚗🚕🚗

*आमच्यासोबत काम करण्याची संधी!*🕴️

*MAI HYUNDAI*

*👉त्वरित पाहिजेत*

*🚕 कार ईव्हॅल्युएटर – 1*🚕🚗

*👨‍💼आवश्यक पात्रता*👇

*▪️किमान 2 वर्षांचा कार व्हॅल्युएशनचा अनुभव*
*▪️वापरलेल्या कार्सच्या बाजारभावाची जाण*
*▪️गाडीची स्थिती ओळखण्याचे कौशल्य*
*▪️रिपोर्ट व संवाद कौशल्य*
*▪️व्हॅल्युएशन टूल्स/सॉफ्टवेअरचा अनुभव असलेल्यांना प्राधान्य*

*सविस्तर अर्ज व फोटोसह स. 10 ते सायं. 6 पर्यंत समक्ष भेटा अथवा अर्ज करा.*

*कुडाळ & कणकवली*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची 26 वर्षे*

*वृक्षवल्ली नर्सरी कंपाऊंड, वागदे, कणकवली*
*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ*

*संपर्क:- 7410006037*

*ई-मेल : | tmsnd@maihyundai.in*

*Terms and conditions*

*Advt link 👇*
https://sanwadmedia.com/174709/
______________________________
*संवाद मीडिया*
*वेबसाईट* : https://sanwadmedia.com/
*फेसबुक* : https://facebook.com/Snvadmedia
*चॅनेल* :https://youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा