You are currently viewing वृद्धत्व

वृद्धत्व

*संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते लिखित वृद्धत्व काव्याचे लेखक विनय पारखी यांनी केलेले रसग्रहण*

 

*वृद्धत्व*

*************

या वृद्धत्वात आज मी शोधतो

काय कितीसे कसे सांडूनी गेले

 

अथक प्रयासही नेटानेच केला

आठव सारेच ते आज चिंबलेले

 

आज मळभ सुखदुःख वेदनांचे

पापण्यातुनी अलवार मिटलेले

 

मौनातुनी मुसमुसता नयनाअश्रू

भावनांचेच आभाळ झिरपलेले

 

जाहली ही तिन्हीसांजली वेळा

गलबलते मनपाखरू वेडावलेले

**************************

*२० जून २०२६. ( २०)*

*©️ वि. ग.सातपुते.(भावकवी)*

📞 *( 9766544908 )*

——————————————-

हे वृध्दत्व म्हणजे ज्येष्ठत्व आहे.

जवळजवळ अनेक वर्षे लिहिलेल्या हजारो रचना, स्वतःची ५० पुस्तके प्रकाशित, इतरांची केलेली १६५० पुस्तके प्रकाशित, अनेक काढलेली चित्रे, केलेला संत साहित्याचा अभ्यास, अथांग जमवलेला मित्र परिवार अशा अनेक गोष्टींचा समावेश करून आलेलं हे ज्येष्ठत्व आहे.

 

हे ज्येष्ठत्व रसिकांच्या प्रेमाने चिंब भिजलेलं आहे. त्यांच्या प्रेमाचा मिळालेला अनुभव त्याची आलेली प्रचिती याच ज्येष्ठत्व आहे.

 

तिन्ही सांजेला घरी येते ती लक्ष्मी. लक्ष्मी सोबत येतो तो लक्ष्मी नारायण. हिच वेळ असते आपल्यात असलेला देवाचा अंश शोधण्याची. ज्या रसिकांनी एवढ्या वर्षात जे भरभरून दिलं त्यांची आठवण काढण्याची. त्यांच स्मरण करण्याची.

जेष्ठ कवीचं हेच तर लक्षण असतं. जुन्या आठवणींना उजाळा द्यायचा, रसिकांच्या ऋणात राहायचं आणि तरुण पिढीला प्रोत्साहन द्यायचं.

 

आप्पा पण आज तेच करता आहेत. रसिक मायबाप श्रोत्यांच्या आठवणी शोधता आहेत. या प्रवासात काही आठवणी सांडल्या, काही मागे राहिल्या त्यांनाच शोधता आहेत.

 

ज्येष्ठता आल्यावरच मग खालची राहिलेली चार कडवी सुचतात.

 

आप्पांच्या जेष्ठत्वाला मानाचा मुजरा.

*विनय पारखी..अंधेरी*

🙏🙏🌹🌹🙏🙏

प्रतिक्रिया व्यक्त करा