*कुडाळ येथे दि.२२ जून रोजी ग्राहक पंचायतची सभा*
वैभववाडी
ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या कुडाळ तालुका शाखेची पुनर्बांधणी करण्यासंदर्भात रविवार दिनांक २२ जून रोजी कुडाळ येथे सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेच्या राज्य कार्यकारिणीच्या तालुका तेथे शाखा स्थापन करणे या अभियानाच्या अनुषंगाने कोकण विभागातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठ तालुका शाखांपैकी काही शाखांची पुनर्बाधणी करुन सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुका शाखांची पुनर्बाधणी करण्याचे काम जिल्हा शाखेने हाती घेतले आहे. मागील आठवड्यात सावंतवाडी तालुका शाखेची पुनर्बाधणी करण्यात आली.
कुडाळ तालुक्यातील जुन्या- नव्या कार्यकर्त्यांची एक सभा रविवार दिनांक २२ जून रोजी सकाळी ठिक १०.३० वा. संत राऊळ महाराज महाविद्यालय कुडाळ येथे जिल्हा अध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि जिल्हा पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजित केली आहे. तरी कुडाळ तालुका शाखेचे जुने पदाधिकारी व सदस्य तसेच तालुक्यातील काही सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या आणि ग्राहक चळवळीची आवड असलेल्या व्यक्तीनी या सभेला वेळेत उपस्थित राहावे. सर्वांशी विचार विनिमय करून कुडाळ तालुका शाखा कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे अशी माहिती जिल्हा शाखेने दिली आहे.

