You are currently viewing कवींच्या अक्षर पेरणीस ऊर्जा देणारा काव्य वेडा माणूस: विनोद अष्टूळ

कवींच्या अक्षर पेरणीस ऊर्जा देणारा काव्य वेडा माणूस: विनोद अष्टूळ

 

बारामतीच्या वसुंधरा वाहिनी आकाशवाणी केंद्रावरील मुलाखतीचा थोडक्यात आढावा काही माणसे काव्य वेडी असतात. सतत ते अक्षर पेरणी करत काव्य जगत असतात. आपणासह इतरांनाही काव्याची अक्षर पेरणी करण्यासाठी धडपडणारा व आपले संपूर्ण आयुष्य मराठी साहित्यासाठी अर्पण करीत नवकवींना व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात. यातून दर्जेदार साहित्यिक कवी निर्माण होतात यासाठी सदैव झटणारे विनोद अष्टूळ हे मराठी साहित्याच्या अक्षर पेरणीच्या दिंडीचे वारकरी बनले आहेत. आजपर्यंत कवी संमेलन दर महिन्याला घेत आले आहेत.

नुकतेच द्विशतकी संमेलन झाले आहे. साहित्यिक आणि समाजसेवक विनोद मारुती अष्टुळ हे गेली १४ वर्ष साहित्य सम्राट या संस्थेमार्फत “ शब्दांची गोडी हीच ग्रंथांची गुढी ” हे ब्रीदवाक्य घेऊन मराठीची साहित्यसेवा करत आहेत. समाजातील आध्यात्मिक क्षेत्रात स्वाध्याय परिवारामध्ये बारा वर्षे कृतिशील संचालक म्हणूनही आध्यात्मिक सेवा केली आहेत.आर्थिक क्षेत्रात भागीरथी नागरी पतसंस्थेमध्ये संस्थापक संचालकपदासह पंचवीस वर्ष विविध पदावर कार्यरत आहेत. कामगार क्षेत्रातसुद्धा नाविन्यपूर्ण त्यांनी कार्य केले आहे. म्हणूनच मनपा गुणवंत गौरव, महाराष्ट्र भूषण, चतुरस्त्रकवी, छत्रपती संभाजी महाराज, महाकवी कालिदास, भिडे वाड्यातील कवी, टॉप टेन कवी, कुसुमाग्रज, अटलबिहारी वाजपेयी, अण्णाभाऊ साठे अशा अनेक पुरस्काराने ते सन्मानित आहेत. सौ.आशाताई मोरे यांनी वसुंधरा वाहिनी बारामती येथील आकाशवाणी केंद्रात मुलाखतीसाठी आमंत्रित केले होते त्यावेळी मुलाखतकार स्नेहल कदम यांनी समाजाभिमुख साहित्य सेवेच्या साहित्यसम्राटच्या विविध उपक्रमाबाबत अष्टुळ कडून माहिती घेत मुलाखत खुमासदार अक्षरांची पेरणी करत दिलखुलासपणे घेतली. साहित्यसम्राट संस्थेची सुरुवात कशी सुचली या प्रश्नावर अष्टुळांनी उत्तर देताना म्हणाले की

इतर संस्थांची कवी संमेलने ही निमंत्रित, नोंदणी झालेल्या कवी साठीच असतात व ते

ठराविक कवींसाठी मर्यादितच असतात त्यामुळे नवोदितासह सर्वच कवींना विचारपीठावर संधी मिळाले पाहिजे. मग त्यामध्ये ग्रामीण, नगरी, विद्रोही, स्त्रीवादी, आदिवासी आणि जेष्ठ कनिष्ठ, नवोदितासह सर्वांच्या विचारांची एकत्र देवाण-घेवाण होण्यासाठी या संस्थेची स्थापना २० फेब्रुवारी २०१२ रोजी फक्त चार-पाच जणांच्या उपस्थितीत झाली.

साहित्यिकांचे साहित्य हे समाजाच्या हिताचं, माणुसकी जपणारं, सत्यबोध सांगणारं, दिशादर्शक आणि सम्राटासारखं दर्जेदार असावं म्हणून साहित्यसम्राट हे नाव संस्थेला दिलं.

संस्थेने अनेक अडचणीवर मात करताना शहरातील बागांमध्ये, मंदिरात, पदपथावर, दवाखाना, स्मशानभूमी, ग्रंथालय, आश्रम, शाळा कॉलेज तसे उत्सवांमध्ये कार्यक्रम घेऊन प्रत्येक सामाजिक घटकापर्यंत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे.

कवींनी आवडीने सहभागी व्हावे म्हणून दरमहा कवींचे वाढदिवस, आपलेच साहित्य इतरांनी वाचून व्यक्त करावे म्हणून मोफत ग्रंथपेढी, आपल्या घरातील नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्यासह साहित्यनिर्मितीसाठी व निसर्गाचा आस्वाद घेत सहपरिवार साहित्यिक श्रावण सहल, दिवाळी सारख्या आवडीच्या सणांमध्ये सर्व धर्मियांनी एकत्र येण्यासाठी म्हणून शब्दगोड दिवाळी, संत वारकरी आणि कवी यांचे विचार एकत्र आणण्यासाठी म्हणून वारीतील कवी संमेलने, कलाकारांची कला, कवींचे काव्य आणि यांच्या घरच्यांनी केलेला फराळ मिळून करण्यासाठी म्हणून कला काव्य फराळ, आपल्याच काव्यातून चित्र निर्माण व्हावे म्हणून काव्य चित्र प्रदर्शन, आपले स्वलिखित ग्रंथ आणि सर्व धार्मिक ग्रंथ सर्वांची एकत्र पूजा व्हावी म्हणून ग्रंथगुढी असे अनेक उपक्रम सामाजिक राबविले आहेत . साहित्याद्वारे सामाजिक हित जपत सामाजिक परिवर्तनाचे ध्येय साध्य केले. संस्थेच्या वतीने विविध बारा उपक्रमांचे संयोजन करुन मराठी साहित्यातील अनेक कवींना घडविले आहे.

मराठी भाषा संवर्धनासाठी विविध ठिकाणी गेली १४ वर्ष कार्यक्रम घेत असताना साहित्याची आवड निर्माण व्हावी म्हणून साहित्यिक क्षेत्रासह इतर क्षेत्रातील नामवंतांना कार्यक्रमात साहित्य सन्मान आणि सम्राट सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. तसेच मराठी सह, हिंदी, उर्दू, इंग्लिश, अहिराणी कोकणी या भाषेतील साहित्यिकांना सुद्धा सोबत घेऊन बहुभाषिक संमेलने घेतली जातात. म्हणूनच साहित्य सम्राटचा प्रवास हा द्विशतकोत्तर सातत्याने बहरत व फुलतच चाललाआहे. आज संस्थेमध्ये चार हजार सातशे कवी कवयित्रींच्या उपस्थितीची नोंद आहे.. अनेक नवोदित, ज्येष्ठ साहित्यिकांनी, पत्रकार आणि रसिक यांनी या साहित्यिक चळवळीसाठी योगदान देत मोलाचेच सहकार्य केले आहे. म्हणूनच ही संस्था मान्यवरांच्या दृष्टीने साहित्य, साहित्यिक आणि साहित्य संघटना निर्माण करणारी म्हणून आज नावारुपास आली आहे.

आज साहित्य सम्राट संस्थेमधील अनेक कवी कवयित्री यांना मानाने व सन्मानाने निमंञित कवी म्हणून बोलवले जात आहे हे साहित्य सम्राट या संस्थेचे यशाचे गमक म्हणावे लागेल . आर्थिक व्यवहार न करता विनामूल्य सेवा अशी ही जपलेली, वाढवलेली साहित्य सम्राट ची कार्यसंस्कृती आहे. आमच्या संस्थेचे सर्व कार्य व विचार वसुंधरा वाहिनीने समाजापर्यंत पोहचविले आहे. विनोद अष्टुळ आणि साहित्यसम्राट संस्थावतीने वसुंधरा वाहिनीने असेच मराठी भाषा व साहित्यातील लेखकांना प्रोत्साहन बळ ऊर्जा देण्यााठी अक्षरपेरणी करावी. या माध्यमातून विचार समाजापर्यंत पोहचवून समाजजागृती करावी हीच अपेक्षा..!

प्रतिक्रिया व्यक्त करा