You are currently viewing शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दशावतारी कलाकारांच्या संघटनेसाठी आम. निलेश राणेंकडून एक लाखाची मदत

शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त दशावतारी कलाकारांच्या संघटनेसाठी आम. निलेश राणेंकडून एक लाखाची मदत

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते घुमडाई मंदिरात मदत सुपूर्द

 

मालवण :

दशावतार कलाकारांच्या संघटनेसाठी शिवसेनेच्या वतीने एक लाखाची मदत देण्यात आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त आमदार निलेश राणे यांच्या वतीने जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या हस्ते सदरची मदत आज घुमडे येथील घुमडाई मंदिरात झालेल्या कार्यक्रमात सुपूर्द करण्यात आली.दशावतार कलाकारांच्या न्याय हक्कासाठी संघटना निर्माण होत असल्याने या संघटनेला जिल्ह्यातील सर्व सभासद सहभागी होण्यासाठी आणि संघटनेचे काम वाढण्यासाठी शिवसेनेच्या वतीने सदरची मदत देण्यात आली आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात आलेल्या मदतीने निमित्ताने दशावतार कलाकारांच्या वतीने शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा सत्कार यावेळी करण्यात आला तसेच मदतीबद्दल आभार व्यक्त करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, सानू वालावलकर यांच्यासह पुरुषोत्तम खेडेकर, महेश गवंडे, पप्पू नांदुस्कर, चंदू खोत, दत्तप्रसाद शेणई, उदय कोणासकर, उल्हास नाईक, मामा माळकर, प्रशांत मिस्त्री, पवन वालावलकर, गौरव शिर्के, प्रशांत मयेकर, सुभाष लोंढे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक दिग्दज दशावतारी कलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा