You are currently viewing वसुंधरा

वसुंधरा

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*वसुंधरा*

 

वसुंधरा तनमनात

सजली हिरव्या पर्णांनी

पांढरा शुभ्र झरा

वाहतो खळखळ रानी

 

अवखळ काळा नभ

विजेसह गडगडतो

ढोल ढगांचे वाजती

धो धो पाऊस बारसतो

 

काळ्या आईच्या कुशीत

इवला जीव अंकुरला

प्रसवली वसुंधरा

पाहून कुणबी हासला

 

निळा डोंगर हसतो

लता वेलीनी फुलतो

गाई, गुरे, फुलपाखरे

जवळ घेवुन हसतो

 

हिरवीगार अवनी

पानांफुलानी बहरली

सुंदर रान पाखरे

निल अंबरी विहारली

 

वाऱ्याच्या लहरी संगे

पिकं हलती डोलती

पाणी वाहते पाटात

पाखरे आनंदे गाती

 

भरल्या कणसा वरी

पाखरांची दिंडी येते

दूर शिवरातूनी

शीळ बासरीची वाजते

 

*शीला पाटील चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा