कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक गुरुवारी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर
सिंधुदुर्गनगरी
कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे हे गुरुवार दि.१९ जून २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत.
जिल्ह्यातील गुन्हे आढावा, कायदा व सुव्यवस्थेचा ते आढावा घेणार असून दुपारी १२ ते २ पर्यंत अभ्यागतांना भेटणार, असल्याचे माहिती पोलीस निरीक्षक,स्थागुअशा तथा सह जनसंपर्क अधिकारी सचिन हुंदळेकर यांनी दिली आहे.

