You are currently viewing राज ठाकरे करणार अयोध्या दौरा

राज ठाकरे करणार अयोध्या दौरा

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि उद्धव यांचे चुलत बंधू राज ठाकरेही अयोध्येला जाणार आहे. १ मार्च ते ९ मार्चच्या दरम्यान एखाद्या दिवशी राज ठाकरे अयोध्या दौरा करणार असून ते रामलल्लांचे दर्शन घेणार आहेत. शुक्रवारी मुंबईमध्ये झालेल्या पक्षाच्या बैठकीमध्ये यासंदर्भात निर्णय घेण्यात आल्याची माहिती पक्षाचे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. ९ मार्च नंतर राज ठाकरे राज्यभरामध्ये दौरा करणार असल्याचे समजते.

राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून शिवसेनेच्या हिंदुत्ववादी भूमिकेबद्दल प्रमुखविरोधी पक्ष असणाºया भाजपाने अनेकदा प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली ही हिंदुत्ववादी पक्षाची जागा भरुन काढण्याच्या दृष्टीकोनातून मनसेने आपला पुढचा राजकीय प्रवास सुरु केल्याचे चित्र मागील काही महिन्यांपासून दिसत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी स्थापन करुन सत्तेत आलेली शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मवाळ झाल्याची टीका मागील एका वर्षामध्ये भाजपाने अनेकदा केली आहे. त्यातच आता राम मंदिराच्या बांधकामासाठी निधी संकलन सुरु झाले असल्याने अयोध्या राम मंदिराचा मुद्दाही चर्चेत आहे. दुसरीकडे मनसे आणि भाजपा एकत्र येण्यासंदर्भातील बातम्या अनेकदा चर्चेत असतात. याच सर्व पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी मतदारांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने मनसेचे प्रयत्न सुरु असल्याचे समजते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =