You are currently viewing पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट

पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे घाट, सातारा घाट

पुढील २४ तासाकरिता ऑरेंज अलर्ट

मुंबई

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरिता  पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना आणि पुणे घाट, सातारा घाट येथे ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

राज्यात मागील २४ तासांमध्ये (१८ जून २०२५ रोजी सकाळपर्यंत) मुंबई उपनगर जिल्ह्यात २९.२ मिमी पाऊस झाला आहे. तर रायगड जिल्ह्यात २१.७ मिमी, पालघर २१.१ मिमी, रत्नागिरी १९.५ मिमी  आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात १९.१ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

राज्यात कालपासून आज १८ जून रोजी सकाळपर्यंत झालेल्या पावसाची सरासरी आकडेवारी पुढीलप्रमाणे (सर्व आकडे मिलिमीटरमध्ये) :- ठाणे  १३.६, रायगड २१.७, रत्नागिरी १९.५,  सिंधुदुर्ग १९.१,  पालघर २१.१, नाशिक ३.१, धुळे ०.३, नंदुरबार ६.५, अहिल्यानगर ०.४, पुणे ६, सोलापूर ०.२,  सातारा ८.१,  सांगली ३.२,  कोल्हापूर १३.९, जालना ०.१, बीड ०.२,  धाराशिव ०.२, नांदेड ०.४,  परभणी ०.२, हिंगोली ०.६, बुलढाणा ०.१, अकोला ०.२, अमरावती ०.५, यवतमाळ ०.२, वर्धा ०.९, नागपूर ०.२, भंडारा १.६, गोंदिया ३.८, चंद्रपूर ०.५ आणि गडचिरोली जिल्ह्यात २.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कोल्हापूर  जिल्ह्यात भिंत पडून व्यक्ती जखमी झाली. नागपूर जिल्ह्यात औद्योगिक रिऍक्टरचा स्पोट होऊन एका व्यक्तीचा मृत्यू तर सहा व्यक्ती जखमी झाल्या आहेत.  मुंबई उपनगर जिल्ह्यात आगीच्या घटनेत दोन व्यक्ती जखमी तर सोलापूर जिल्ह्यात रस्ते अपघातात दोन व्यक्ती जखमी आणि वीज पडून एक प्राण्याचा मृत्यू झाला असल्याची माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

प्रतिक्रिया व्यक्त करा