You are currently viewing शनिवारी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या गीतांची नि:शुल्क मैफल ऐकण्याची संधी

शनिवारी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या गीतांची नि:शुल्क मैफल ऐकण्याची संधी

*शनिवारी सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या गीतांची नि:शुल्क मैफल ऐकण्याची संधी*

पिंपरी

इंडियन म्युझिकल क्लब (आय. एम. सी.) यांच्या वतीने शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी सायंकाळी ०६:०० ते ०९:३० या कालावधीत प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह, चिंचवड येथे तरुण पिढीचे लोकप्रिय गायक तसेच राष्ट्रीय पुरस्कारासह इतर एकूण ३३ सन्मानांचे मानकरी असलेले सुप्रसिद्ध गायक सोनू निगम यांच्या गीतांची नि:शुल्क मैफल ऐकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.
‘गाता रहे मेरा दिल…’ या शीर्षकांतर्गत वॉल्ट्झ म्युझिकल बँडतर्फे लाईव्ह वाद्यवृंदासहित इंडियन म्युझिकल क्लबच्या गायक – गायिका सोनू निगम यांनी गायलेल्या वैविध्यपूर्ण लोकप्रिय गीतांचे सादरीकरण करणार आहेत. ‘गाता रहे मेरा दिल…’ या मैफलीचे हे २७वे संगीतपर्व असून नेहमी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन, संयोजन, काटेकोर नियोजन आणि त्याचबरोबर रसिक श्रोत्यांना उत्तमोत्तम गीते ऐकवण्याचा क्लबचे संचालक अनिल झोपे आणि राखी झोपे या दांपत्याचा प्रयत्न असतो. विनाशुल्क असलेल्या या संगीत मैफलीचा लाभ रसिक श्रोत्यांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

प्रतिक्रिया व्यक्त करा