You are currently viewing संदीप सावंत परिवर्तन दूत पुरस्काराने सन्मानित  

संदीप सावंत परिवर्तन दूत पुरस्काराने सन्मानित

संदीप सावंत परिवर्तन दूत पुरस्काराने सन्मानित

कणकवली

संदीप श्री. सावंत कणकवली सिंधुदुर्ग यांना डॉ.व्ही. टि पाटील फाउंडेशन कोल्हापूर यांचा मार्फत दिला जाणारा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य बद्दल मीना सामंत परिवर्तन दूत पुरस्कार कोल्हापूर येथील गोविंदराव टेंबे रंगमंदिर देवल क्लब कोल्हापूर या ठिकाणी त्यांना रोख रक्कम 5000/- मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

स्वयंदीप चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात युवक युवती व महिलांकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात काम करण्यात आले

महिलांजवळ असलेल्या कौशल्याचा वापर करून त्यांना त्यामध्ये आधुनिकतेची जोड देऊन रोजगार निर्मिती कशी करू शकतो याचे प्रशिक्षण देऊन स्वतःचा व कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक उद्योजिका तयार केल्या

स्वयंसहाय्यता बचत गट महिला व युवक युवतीन करिता खाद्यपदार्थ हस्तकला चित्रकला टाकाऊतून टिकाऊ वस्तू बनवणे यासारख्या अनेक प्रशिक्षणाचे आयोजन करून रोजगाराच्या संधी निर्माण करून दिल्या.

सध्या लोक पावत चाललेली व महाराष्ट्राची शान असलेली गोधडी उद्योग सुरू करून अनेक महिला आपल्या फावल्या वेळेचा उपयोग करून हाताने गोधडी शिवून आपला उदर निर्वाह करत आहे

स्वयंमदीपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील अनेक गरीब व होतकरू मुलांना शैक्षणिक साहित्य वाटून त्यांना शिक्षण प्रवाहात आणण्याचे काम स्वयंदीप ट्रस्ट आज करत आहे

भविष्यात स्वयंदीप च्या माध्यमातून 500 हून अधिक महिला स्वतःचा रोजगार उभा करतील असा मानस आहे त्यांना मिळालेल्या या पुरस्कारा मुळे त्याच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

प्रतिक्रिया व्यक्त करा