*महिलांच्या सशक्त योगदानाची प्रेरणादायी भावना*
वेंगुर्ला :
राजमाता जिजाऊ यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन म्हणून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळू देसाई यांनी प्रभावीपणे पार पाडले, तर सुषमा प्रभुखानोलकर यांनी राजमातांच्या जीवनकार्याची प्रेरणादायी माहिती सादर केली. सुजाता पडवळ यांनी आभार प्रदर्शन करत सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.
या कार्यक्रमास तालुकाध्यक्ष विष्णू (पप्पू) परब, जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, जिल्हा उपाध्यक्ष सुषमा प्रभुखानोलकर, माजी तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, जिल्हा महिला मोर्चा उपाध्यक्ष वृंदा गवंडळकर, तालुका महिला मोर्चा अध्यक्ष सुजाता पडवळ, युवा मोर्चा अध्यक्ष प्रणव वायंगणकर, दादा केळुसकर, तालुका सरचिटणीस आकांशा परब, शहर अध्यक्ष श्रेया मयेकर, तसेच माजी नगराध्यक्ष पूजा कर्पे, हसीना मकानदार, रसिका मठकर, मानसी परब, वृंदा मोर्डेकर, शरद मेस्त्री, कौस्तुभ वायंगणकर, सायमन अल्मेडा, वैभव होडावडेकर, राजन परब, प्रसाद वेंगुर्लेकर, दिलीप परब, आदी पदाधिकारी उपस्थित होते.
हा कार्यक्रम राजमाता जिजाऊंच्या आदर्शांचा जागर करत महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक प्रेरणादायी टप्पा ठरला.
जय जिजाऊ! जय शिवराय!

