*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच तथा काव्य निनाद साहित्य मंचच्या सन्मा सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रतिभा पिटके लिखित अप्रतिम काव्यरचना*
*हा माझा मार्ग एकला*
हा माझा मार्ग एकला
आला तो निघून गेला
मी दुःख कशाला करू
जीव होई अर्धमेला
आसवे बोलू लागली
खंत कुणा न वाटली
जो तो मग्न स्वतःमध्ये
जीवाची काहिली झाली
दुःखभोग सोसतांना
कुणी कुणाचे नसते
जैसे कर्म तैसे फल
स्वतःभोगावे लागते
असे अंतिम सत्य
व्यवहार आहे खरा
आहे तेच स्वीकारावे
सृष्टीचा नियम खरा
शून्य एक उरलेले
अशी आत्म्याची कहाणी
मौन होणार वैखरी
नसावे डोळ्यात पाणी
प्रतिभा पिटके
अमरावती

