तर दोडामार्ग तालुका पत्रकार संघ उपविजेता
ओरोस
जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ सिंधुदूगनगरी आयोजित क्रिकेट स्पर्धेत मालवण तालुका पत्रकार संघ विजेता, तर उपविजेता संघ दोडामार्ग तालुका ठरला आहे अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या लढती सामने पहायला मिळाले. सिंधुदुर्गनगरी येथे सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार समितीच्या वतीने आणि लाईफ टाईम हॉस्पिटल प्रायोजित पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे उद्घाटन आमदार नितेश राणे यांनी केले.
प्रत्येक तालुक्यातील पत्रकार समित्यांच्या सांगीक खिलाडी वृत्तीचे दर्शन या स्पर्धेत दिसून आले, पहिला उद्घाटन सामना कणकवली विरुद्ध कुडाळ यांच्यात रंगला उदघाटन सामन्यात आमदार निलेश राणे याचे चैकार फटके बाजी राजकिय खिलाडूचे दशन दिसले तर अंतिम विजेता उपविजेता दोडामार्ग विरुद्ध मालवण यांच्यात लढती झाल्या. सिंधुदुर्ग नगरी पत्रकार संघाने सेमी फायनल पर्यंत मजल मारली. परंतु दोडामार्ग संघाने मुख्यालय पत्रकार संघाला पराभूत केले.
एक दिवसीय टेनिस बॉल क्रीडा स्पर्धेचे सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राउंड वर पत्रकारांच्या खिलाडू वृत्तीचे दर्शन पहायला मिळाले आमदार नितेश राणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पत्रकारांसाठी अशा प्रकारची विविध स्पर्धा आज आयोजित करणे आवश्यक आहे आपण पत्रकार मंडळी बातम्यांसाठी फिरत असता आणि आम्ही राजकारणी मंडळी मतांसाठी फिरत असतो पत्रकार विरुद्ध सर्व पक्ष राजकीय लोकप्रतिनिधींचा संघ अशी क्रिकेट स्पर्धा आयोजन करणे आवश्यक आहे. यासाठी जिल्हा पत्रकार संघाने पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. आजच्या सिंधुदुर्गनगरी पत्रकार समितीने आयोजित केलेल्या क्रिकेट स्पर्धेसाठी आमदार वैभव नाईक यांनी कार्यकम ठिकाणी भेट देऊन जिल्ह्यातील पत्रकारांना शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते उपस्थित होते. या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी पोलीस परेड ग्राउंड पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी मोफत दिले होते.
पत्रकारांच्या भव्यदिव्य प्रत्येक तालुक्यातील पत्रकारांनी या मैदानावर येऊन आपल्या क्रिकेट खेळाडू वृत्तीचे दर्शन घडविले. सिंधुदुर्ग नगरीत आयोजित पत्रकारांच्या या क्रिकेट स्पर्धा आणि संपूर्ण कार्यक्रमासाठी सर्वांचे प्रशासकीय यंत्रणेचे हे लक्ष केंद्रित होते सायंकाळी अंतिम सेमी फायनल मध्ये आलेला दोडामार्ग विरुद्ध मालवण तालुका पत्रकार संघ यांच्यात अटीतटीची लडत झाली या लढतीमध्ये मालवण संघाने विजय संपादन केला. तर उपविजेता संघ दोडामार्ग तालुका ठरला. त्यानंतर जिल्ह्याचे निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, पोलीस अधीक्षक राजेंद्रां दाभाडे याच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्या आणि उपविजेत्या संघांची पारितोषक देण्यात आली. यावेळी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी श्री हेमंत चव्हाण, माजी प सदस्य राजन परब, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेश जेठे, जिल्हा सचिव उमेश तोरस्कार , सिंधुदुर्गनगरी मुख्यालय पत्रकार समितीचे अध्यक्ष संदीप गावडे, सचिव संजय वालावलकर, उपाध्यक्ष नंदकुमार आयरे, खजिनदार लवू महाडेश्वर, सहसचिव दत्तप्रसाद वालावलकर, विनोद परब,सतीश हरमलकर, विनोद दळवी, प्रसाद पताडे, मनोज वारंग,देवयानी वरसकर ,गुरू दळवी,रवि गावडे शांताराम राऊत, तर पत्रकार समितीचे सवे सर्वा आणि क्रीडा क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व गिरीश परब आणि विल्सन मंडळ वागदे यांचे सर्व क्रीडा प्रतिनिधी समालोचक पंच सव तालुक्यातील तालुकाध्यक्ष उपस्थित होते. अत्यंत रोमहर्षक क्रीडा समर्थांचे दर्शन सिंधुदुर्गनगरी पोलीस परेड ग्राउंड वर पहायला मिळाले यावेळी सर्वच तालुक्यातून अशा प्रकारच्या सिंधुदुर्गनगरी पत्रकार समितीने दरवर्षी पत्रकार क्रीडा स्पर्धा अयोजीत कराव्यात आम्ही सर्व तालुका पत्रकार समित्या सहभागी होऊ असे आव्हानही करण्यात आले आहे. शेवटी उपस्थित मान्यवर पोलीस परेड ग्राउंड चे पोलीस अधिकारी क्रीडाप्रेमी आणि सहकार्य करणारे सर्व ज्ञात-अज्ञात त्यांचे आभार मानण्यात आले.