अमरावती दिनांक 16 : महाराष्ट्रातील विद्यार्थी बहुसंख्येने प्रशासनात जावेत यासाठी महाराष्ट्र शासन सातत्याने प्रयत्नरत आहे. या प्रयत्नाचा एक भाग म्हणून महाराष्ट्र शासनाने ठीक ठिकाणी आयएएस प्रशिक्षण केंद्रे उभारली आहेत. या ठिकाणी कलेक्टर होणाऱ्या मुलांना विनामूल्य प्रशिक्षण देण्यात येते तसेच त्यांची निवास व्यवस्था भोजन व्यवस्था व विद्यावेतन देण्याची देखील तरतूद महाराष्ट्र शासनाने केली आहे. महाराष्ट्र शासनाची ही केंद्रे मुंबई ठाणे पुणे कोल्हापूर नागपूर नाशिक छत्रपती संभाजी नगर अमरावती येथे उपलब्ध आहेत. या सर्व केंद्रावर कलेक्टर होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर त्यासाठी एक प्रवेश परीक्षा महाराष्ट्र शासनाने आयोजित केली आहे. महाराष्ट्र शासनाच्या या योजनेचा यांना लाभ घ्यावयाचा आहे व या प्रशिक्षणाचा फायदा घेऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाची आयएएस ही परीक्षा द्यावयाची आहे त्यांनी अधिक माहितीसाठी www.siac.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावयाची आहे. ह्या सर्व केंद्रा साठी एक सामायिक परीक्षा पुढील महिन्यात होणार आहे त्यासाठी ताबडतोब अर्ज दाखल करावे याचे आहेत. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्य प्रशासकीय प्रशिक्षण केंद्र छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोर मुंबईच्या संचालिका डॉ. भावना पाटोळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. अमरावतीचे केंद्र हे शासकीय विदर्भ ज्ञान विज्ञान संस्था म्हणजे जुने विदर्भ महाविद्यालय येथे असून नागपूरचे आयएएस केंद्र हे बर्डी वरील झिरो मैल चा परिसरात आहे तसेच मुंबईचे केंद्र हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल समोरील हजारी मल मार्गावर आहे कोल्हापूरचे केंद्र हे राजाराम महाविद्यालयाच्या परिसरात असून या सर्व केंद्रांमध्ये हजारो विद्यार्थी आयएएस चे प्रशिक्षण घेत आहे. महाराष्ट्र शासनाच्या या अभिनव प्रशिक्षणाचा लाभ घेऊन विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत येण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा व त्यासाठी या विनामूल्य प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे आवाहन मिशन आय ए एसचे संचालक प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे यांनी एका निवेदनाद्वारे केले आहे. यात महाराष्ट्रातील या केंद्रातून आजपर्यंत अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन आयएएस आयपीएस झालेले आहेत. या ठिकाणी तज्ञ मार्गदर्शक उपलब्ध असून आयएएस ला उपयुक्त असे सर्व उपक्रम या सर्व केंद्रांमध्ये सातत्याने राबविण्यात येतात. महाराष्ट्रातील आयएएसची टक्केवारी वाढवण्यासाठी हे सर्व केंद्र उपयुक्त आहेत. अशा प्रकारची आयएएस प्रशिक्षण केंद्रे प्रारंभ करून महाराष्ट्राने खऱ्या अर्थाने आयएएस करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक उपयुक्त असे दालन उपलब्ध करून दिले आहे .त्यासाठी महाराष्ट्र शासन हे अभिनंदन आज पात्र आहे.
प्रा. डॉ. नरेशचंद्र काठोळे
संचालक
मिशन आयएएस
अमरावती कॅम्प
9890967003

