*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्मा सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि ग सातपुते लिखित अप्रतिम काव्यरचना*
*सुंदर सोहळे*
*************
कळले नाही कधी काय जाहले
तुझ्यात मीच कसा हरवलो होतो
जीवा आसक्ती कुठलीच नव्हती
पण रूपास तुझ्या भूललो होतो
मृगनयनी तू सोज्वळ सुंदर बाला
नित्य तुज मी सहजी पहात होतो
तू सुंदर अबोली लाजरी कलीका
पाहता तुला मीच दरवळलो होतो
तूच गे लाघवी सज्जल बकुळगंधा
पारावरी आजही तुझा वृक्ष डवरतो
अजूनही आठविता ते सुंदर सोहळे
क्षणक्षण गंधसुगंधी सदा दरवळतो
***********************
*©️वि.ग.सातपुते.( भावकवी )*
📞 *( 9766544908 )*
