You are currently viewing गोळवण गावातील विकासकामे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करणार : दत्ता सामंत

गोळवण गावातील विकासकामे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करणार : दत्ता सामंत

गोळवण गावातील विकासकामे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पूर्ण करणार : दत्ता सामंत

गोळवण कुमामे डिकवल येथील उबाठा कार्यकर्ते व ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश

आमदार निलेश राणे यांच्या विकास कार्यावर प्रेरित होऊन जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना प्रवेश

मालवण

मालवण तालुक्यातील गोळवण कुमामे डिकवल मधील उबाठा कार्यकर्ते व अनेक ग्रामस्थांनी रविवारी सायंकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करून हाती धनुष्यबाण घेतले. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या कार्याने प्रेरित व प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तर गोळवण कुमामे डिकवल मधील विकास कामे प्रामुख्याने पूर्ण करण्याचे आश्वासन यावेळी दत्ता सामंत यांनी ग्रामस्थांना दिली.

मागील कित्येक वर्षे गोळवण कुमामे डिकवल मधील ग्रामस्थांना अपेक्षित विकास कामे न झाल्याने उबाठा कार्यकर्ते व ग्रामस्थ व महिलांनी रविवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी झालेल्या कार्यक्रमात जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, शिवसेना सरचिटणीस दादा साईल, मालवण तालुकाप्रमुख राजा गावडे, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, जि प माजी बांधकाम सभापती अनिल कांदळकर, मंदार लुडबे, बबन घाडीगावकर, प्रशांत परब, विकास परब, तुकाराम जाधव, मंगेश चव्हाण, सामाजी गावडे, नंदादीप नाईक, कमलेश प्रभू व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत म्हणाले की मागील कित्येक वर्षे गोळवण कुमामे डिकवल राणे परिवाराच्या पाठीशी राहिला आहे. प्रत्येक निवडणुकीत या गावातून ७०-७५% मतदान नारायण राणे यांना झालेले आहे. मात्र मागील दहा वर्षात या भागात अपेक्षित विकास कामे झालेले दिसत नाही यामुळे येथील ग्रामस्थांनी आपल्याशी संपर्क साधून प्रामुख्याने शिल्लक विकास कामे आपल्या निदर्शनास आणून दिली. व शिवसेना पक्षात आपल्या काम करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. गोळवण मधील विकास कामे प्रसंगी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता प्राधान्य क्रमाने गणेश चतुर्थी पूर्वी व काही कामे पावसाळ्यानंतर पूर्ण करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले. आमदार निलेश राणे यांनी आमदार झाल्यावर आतापर्यंत १००० कोटीपेक्षा जास्त निधी मालवण कुडाळ मतदार संघात आणून आपल्या कामाची चुणूक दाखविली आहे. आमदार निलेश राणे व आपल्या मतदारसंघात चांगला समन्वय निर्माण झाला असून आगामी काळात मालवण तालुक्यात किमान ५०० तरुणांना रोजगार देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे दत्ता सामंत यांनी सांगितले. गोळवण मधील ग्रामस्थांनी आपल्यावर व पक्षावर दाखविलेला विश्वास आपण सार्थकी लावू असे आश्वासन त्यांनी दिले.

यावेळी शिवसेना उपनेते संजय आंग्रे, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, अनिल कांदळकर, दादा नाईक यांनी शिवसेना पक्ष धोरणाबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी दत्ता सामंत यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश केले.

प्रवेश कर्त्यांमध्ये आनंद गावडे, शंकर गावडे, तुकाराम गावडे, श्रीकृष्ण तेली, रमेश गावडे, रघुनाथ गावडे, बाबाजी गावडे, दुर्वेश गावडे, ऋषी गावडे, अथर्व गावडे, महादेव गावडे, राकेश गावडे, प्रवीण चिरमुले, विशाल घाडी, अरविंद घाडी, संतोष घाडी, सुभाष मालंडकर, महेश घाडी, अजित घाडी, ज्ञानदेव घाडी, हितेश घाडी, सुरेश घाडी, मंगेश घाडी, विजय घाडी, शांताराम थवी, अनंत थवी, पद्माकर थवी, विकास परब, तुकाराम जाधव, दीपक जाधव, श्रीकृष्ण तेली, प्रशांत परब, प्रवीण शिवलकर, नंदादीप नाईक, बाबुराव चिरमुले, राजेंद्र गावडे, सुनील गावडे, महेंद्र चव्हाण, रामचंद्र मेढेकर, सागर जाधव, रमेश जाधव, सत्यवान जाधव, चंद्रकांत कोंडसकर, आनंद चव्हाण, संकेत चव्हाण, बाळा गोळवणकर, विजय परब, दया राणे, दया चव्हाण, मनोज चव्हाण, रामचंद्र सावंत, श्याम चिरमुले, गौरव चिरमुले, रोहन देसाई, वसंत गोळवणकर, संकेत चव्हाण, मंगेश अपराध, रमेश गावडे, संदीप गावडे, एकादशी गावडे, सुरेखा नाईक, सुलक्षणा परुळेकर, शुभांगी नाईक, धनश्री देसाई, विभा परब, सुनंदा खरात, अनिता गोळवणकर, गणेश गावकर, अरुण रावले, संतोष चव्हाण, सचिन रावले, मनीष जाधव, अमित घाडीगावकर, सचिन गावडे, यशवंत साळकर व इतर कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दादा नाईक, प्रास्ताविक विकास परब यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा