आंबोली तेरवण एसटी बस सेवा सुरू करण्याचे लेखी पत्र दिल्याने धरणे आंदोलन मागे
दोडामार्ग
दोडामार्ग तालुक्यातील शेवटच्या टोकावर असलेल्या तेरवण गावात ७५ वर्षानंतर प्रथमच आंबोली, चौकुळ, इसापूर, तेरवण वस्ती बस सेवा सुरू झाली. पण अचानक ती बंद केली. प्रवाशांना मधोमध उतरून बस कुंभवडे गावात नेणे, हे प्रकार सुरू झाले. चालक वाहक यांची राहण्याची सोय या बाबी पुढे करून बससेवा बंद केली यामुळे मोठी गैरसोय होत होती. बस सेवा सुरू करा यासाठी दत्ताराम गावकर, यांच्या नेतृत्वाखाली तेरवण ग्रामस्थ यांनी आंबोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन सुरू केले होते. अखेर गावीत यांनी सोमवार पासून बस सुरू केली जाईल असे लेखी पञ दिल्याने आंदोलन मागे घेतले.
तेरवण हा दोडामार्ग तालुक्यातील शेवटचा गाव चंदगड हद्दीत येतो. पण या गावातील लोकांना दोडामार्ग येथे येण्यासाठी ५० ते ६० किलोमीटरचा फेरा मारून दोडामार्ग या ठिकाणी यावे लागते. आंबोली तेरवण ते बेळगाव बस सेवा सुरू करावी ही प्रमुख मागणी होती. ही बस फायदेशीर ठरणार होती. पण सावंतवाडी आगाराने तेरवण वस्ती बस ती देखील वेळ चूकीची यामुळे गैरसोय होत होती. आंबोली ते चौकुळ कुंभवडे तेरवण ही बस गेले दोन-तीन महिने सुरू करण्यात आली होती पण ती बंद सुरू अशी अवस्था होती. काही वेळा प्रवाशांना मधोमध उतरून ही बस वस्तीकरिता कुंबवडे ते नेली जात होती यामुळे तेरवण गावातील लोकांना पायी चालत जावे लागत होते.
हा मुद्दा उपस्थित करत बंद केलेली बस पुन्हा सुरू करावी यासाठी मनसेचे कार्यकर्ते दत्ताराम गावकर यांच्या नेतृत्वाखाली पांडुरंग गवस, तुकाराम गवस, प्रकाश गवस, नागेश गवस, अर्जुन नाईक तसेच इतर ग्रामस्थ महिला यांनी आंबोली बसस्थानक येथे धरणे आंदोलन सुरू केले होते. अखेर गावित यांनी चौकुळ आंबोली बस सोमवारपासून सुरू केली जाईल असे लेखी पत्र दिले. तेरवण बसवर येणारे वाहक चालक यांची राहण्याची तसेच शौचालय व्यवस्था तेरवण येथे करण्याचे ग्रामस्थांनी मान्य करून त्याची व्यवस्था केली जाईल असे पत्र आगार व्यवस्थापक सावंतवाडी यांना देण्यात आले. सावंतवाडी आगारप्रमुख गावित यांच्या लेखी पत्रानुसार धरणे आंदोलन मागे घेण्यात आले. तसेच आंबोली तेरवण हेरा पाटणे बेळगाव बस सेवा सुरू करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

