*ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ. कविता किरण वालावलकर लिखित अप्रतिम काव्यरचना*
*बाप…*
बाप माझा मुक्त श्वास
देतो सदा मनी साथ
सदा खंबीर पाठीशी
नाही करत अनाथ ||१||
बाप जणू धडपड
दुःख मनी लपवतो
संकटांच्या अंधारात
ताऱ्यासम तेजाळतो ||२||
बाप तो मार्गदर्शक
दाखवतो नित्य मार्ग
मूर्त प्रेरणा स्वरूप
कष्ट हेच त्याचा स्वर्ग ||३||
जबाबदारीची जाण
देतो बाप हा करुन
हास्य पेरतो कुटुंबी
घाम जीवनी गाळून ||४||
बाप सुखाचे चांदण
बाप मनाचा आधार
काळजाच्या स्पंदनांचा
गंधाळता असा हार ll५ll
सौ कविता किरण वालावलकर
दावणगिरी , कर्नाटक
