सिंधुदुर्ग
सिंधुदुर्गनगरी येथील नियोजित १०० विद्यार्थी क्षमतेच्या वैद्यकीय महाविद्यालयासाठी गट अ ते ड च्या ५२४ पदांच्या निर्मितीस तसेच भरतीस मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी येणाऱ्या ११८. कोटी खर्चाच्या अंदाजित खर्चासही मान्यता देण्यात आली आहे. यात गट अ ते क मधील नियमित २८७ पदे, ११८ विद्यार्थी पदे, त्याचप्रमाणे गट क ५८ पदे, गट ड ६१ पदे चार टप्प्यात निर्माण करण्यास मान्यतादेण्यात आली आहे.
प्रथम वर्षासाठी आवश्यक पदे तात्काळ निर्माण केली जाणार आहेत. यासंदर्भातील आदेश शुक्रवारी सहसचिव शिवाजी पाटणकर यांनी काढले आहेत.