*मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर कुडाळ येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
कुडाळ
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून श्री. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील जिवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रय या वृद्धाश्रमास मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून तसेच कुणाल किनळेकर यांच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब, तालुकाध्यक्ष हेमंत जाधव, उपतालुकाध्यक्ष गजानन राऊळ, विभाग अध्यक्ष प्रथमेश धुरी तसेच अविनाश अणावकर,शाखाध्यक्ष पिंगुळी शुभम धुरी व सागर सावंत आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष धीरज परब यांनी आपले मनोगत व्यक्त केले व तदनंतर आंनदाश्रय संचालक यांनी राज ठाकरे यांचे आभार व्यक्त करत त्यांच्या उदंड आयुष्याची कामना केली.
